पैसे परत केले नाही म्हणून मुलाला नेले पळवून

दीपक कच्छवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ब्राम्हणशेवगे( ता.चाळीसगाव) येथील शिवाजी दुधा राठोड हे  मुकादमाचे काम करतात.त्यांच्या घरी संशयित आरोपी संजय गाढवे राहणार पुणे हा 11 नोव्हेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास शिवाजी राठोड यांच्या घरी आला.घरात असलेल्या त्यांच्या पत्नीला घराबाहेर बोलवून शिवीगाळ केली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ब्राम्हणशेवगे( ता.चाळीसगाव) येथील एकाने उसतोडणीपोटी उचल घेतलेले 4 लाख 75 हजार रूपये परत दिले नाही. या कारणावरून महिलेला शिवीगाळ करीत मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन, मुलाला पळवुन नेले.म्हणुन याप्रकरणी पुण्याच्या एका विरूद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ब्राम्हणशेवगे( ता.चाळीसगाव) येथील शिवाजी दुधा राठोड हे  मुकादमाचे काम करतात. त्यांच्या घरी संशयित आरोपी संजय गाढवे राहणार पुणे हा 11 नोव्हेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास शिवाजी राठोड यांच्या घरी आला.घरात असलेल्या त्यांच्या पत्नीला घराबाहेर बोलवून शिवीगाळ केली. तसेच उचल घेतले 4 लाख 75 हजार रूपये परत केले नाही तर मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत मुलगा रवि यास उचलुन घेवुन गेले.

शिवाजी राठोड यांच्या तक्ररीवरून संजय गाढवे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार छबुलाल नागरे हे करीत आहेत.

Web Title: child was taken away as the money was not returned in chalisgaon