Nandurbar : शाळेसाठी चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास | Latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

As there is no bridge over the river here, when it rains, the children's school is closed.

Nandurbar : शाळेसाठी चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास

धडगाव (जि. नंदुरबार) : सातपुड्यात गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व नदी नाल्यांना पूर आले असून पूल नसल्याने अनेक वाड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे.

पाण्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नसल्याने शाळा अघोषित बंद झाली आहे. दुसरीकडे ग्रामस्थांनाही याच जिवघेण्या पाण्यातून जात कसरत करावी लागत आहे. काल्लेखेतपाडा येथील ग्रामस्थ अन विद्यार्थ्यांवरही अशीच वेळ आली आहे. (Children deadly journey to school nandurbar latest marathi news)

रस्तापूल नसलेल्या गावांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागले. शनिवारी अशाच परिस्थितीचा फटका काल्लेखेतपाडा शाळेला बसला. या पाड्याला उमराणीपासून पक्का रस्ता, पूल नसल्याने शनिवारी (ता.३०) काल्लेखेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर नदीनाल्याला पूर आल्याने पुलाअभावी नदी नाला पार करताना विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागला.

काल्लेखेतपाडा शाळा ही जगातील शंभर शाळांमधली ग्लोबल पुरस्कार प्राप्त ठरलेली असून सावरीपाडा, देवपाडा, मोवाडीपाडा, होळीपाडा, ओवायापाडा, पाटीलपाडा, निलरीपाडा, खालचापाडा व बारीपाडा, आमला, बिलान बारीपाडा, कुंडाईपाडा अशा पाड्यांतून साठ ये सत्तर विद्यार्थी दोन ते चार किलोमीटरच्या पायवाटेने काल्लेखेतच्या जिल्हा परिषद शाळेत जात असतात.

हेही वाचा: इस्लामीक नवीन वर्षास प्रारंभ; 9 ऑगस्टला मोहरम

त्यांना वाटेत लागणाऱ्या एकाच नदीचे नाले सात आठ ठिकाणी लागत असल्याने पावसाळ्यात मोठी गैरसोय होत असते. जास्त पाऊस झाल्यास दोरखंडाच्या सहाय्याने तरूण व पालक वर्ग काढत असतात.

मात्र विद्यार्थी जात असताना अचानक पाणी वाढले तर या विद्यार्थ्यांना धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे या दोन ते चार किलोमीटरदरम्यान येणाऱ्या नदी नाल्यांनवर पूल बांधणे गरजेचे झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शाळेजवळ नदीनाल्यावरच्या पुलासाठी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे, परंतू प्रशासन दखल घेत नसल्याने विद्यार्थी पालक -ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
"काल्लेखेतपाडा येथील शाळेत शिक्षणासाठी येणारी मुले अवयापाडा, होळीपाडा, सावऱ्या पाडा, बारीपाड्यातून येत असतात. नदी नाल्यावरील पूल नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. जीव मुठीत घेऊन मुलांना शाळेत पाठवावे लागते. प्रशासनाने पूल बांधणे गरजचे आहे. "
- सर्व ग्रामस्थ, काल्लेखेतपाडा.

हेही वाचा: Nashik : ‘MVP’ची निवडणूकप्रक्रिया शुक्रवारपासून?

Web Title: Children Deadly Journey To School Nandurbar Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top