कॅशलेस व्यवहारात चिनी कंपन्यांचा फायदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

धुळे - रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहाराचा आग्रह धरणारे केंद्र व राज्य शासन चीनच्या कंपन्यांचा फायदा करत आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने आज या निर्णयाचा निषेध केला. कॅशलेस व्यवहारासाठी ज्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यात चीन, सिंगापूरच्या कंपन्यांचा समावेश आहे.

चीन भारताचा छुपा शत्रू असताना या देशाला फायदा करून देण्याचे हे धोरण आहे, याशिवाय यामुळे भविष्यात संरक्षणाच्या अनुषंगाने भारताला परिणाम भोगावे लागू शकतात, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे चीनच्या कंपनीला मजबूत न करता सरकारने भारतीय कंपनीचा विचार करावा, मोफत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. चीनची कंपनी पेटीएमची पत्रकेही जाळण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून बॅंकांसमोरील रांगांमध्ये ज्या नागरिकांची मृत्यू झाला, त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, प्रदेश सरचिटणीस प्रभादेवी परदेशी, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, योगिता पवार, अबुलास खान, डॉ. कैलास सोनवणे, रफिक शाह, इम्तियाज पठाण, योगेश विभूते, मसूद सरदार, नाझनीन शेख, संजय बैसाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Chinese companies use cashless transactions