सरकारच्या धोरणाने मारले गेले शेतकरी - आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

चोपडा - बिबट्याला मारण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बंदूक घेऊन जातात. त्याने शेतकरी जास्त मारले, की तुम्ही जास्त मारलेत याचा कधी तरी विचार करा. वाघ, बिबट्याने जितके मारले नाहीत, त्यापेक्षा अधिक शेतकरी भाजप सरकारच्या धोरणामुळे मेलेत, अशी घणाघाती टीका शेतकरी कर्जमाफी सुकाणू समितीचे सदस्य, आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केली.

चोपडा - बिबट्याला मारण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बंदूक घेऊन जातात. त्याने शेतकरी जास्त मारले, की तुम्ही जास्त मारलेत याचा कधी तरी विचार करा. वाघ, बिबट्याने जितके मारले नाहीत, त्यापेक्षा अधिक शेतकरी भाजप सरकारच्या धोरणामुळे मेलेत, अशी घणाघाती टीका शेतकरी कर्जमाफी सुकाणू समितीचे सदस्य, आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केली.

येथील पालिकेच्या शरश्‍चंद्रिका पाटील नाट्यगृहात आज झालेल्या शेतकरी, आदिवासी कर्जमुक्ती परिषदेत ते बोलत होते. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, बहुजन मुक्तीचे मुकुंद सपकाळे, एस. बी. पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश बारेला, सुरेश पाटील आदी व्यासपीठावर होते. 
आमदार कडू पुढे म्हणाले, की लाखोंच्या संख्येने शेतकरी घेऊन जाण्यापेक्षा भगतसिंगांसारखे ५० जण घेऊन जावेत, तेव्हा या सरकारने चालविलेली लूट थांबेल. सहा हजार रुपये 

सरकारच्या धोरणाने  मारले गेले शेतकरी 
कापसाला भाव मिळावा, म्हणून उपोषणाला बसलेले मंत्री गिरीश महाजन आता कुठे गेलेत? साधं एखादं पत्र मोदींना लिहावंसं कोणाला वाटलं नाही. पाच वर्षांपूर्वी भाव मिळावा, म्हणून तुम्ही उपोषणाला बसणारे लोक सत्तेत आलेत अन्‌ विसरलेही. एका बाजूस कर्जमाफी द्यायची आणि पुन्हा लुटीचे सत्र कायम ठेवायचे हेच या सरकारचे धोरण आहे. राज्य सरकार सोयाबीनला ४ हजार ७४१ च्या भावाची शिफारस करते. केंद्र सरकार ३ हजार ५० रुपये जाहीर करते, ही किती तफावत आहे. यामागे एका गावाचे ५ कोटी रुपयांचे नुकसान होते.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, की आदिवासी, शेतकरी परिषद
येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाम फोडेल. देशभरातील आदिवासी व शेतकऱ्यांना न्याय देणार नसाल, तर खुर्चीवर त्यांना राहू देणार नाहीत. जिथे वीज पोचली नाही, तेथे ऑनलाइन कुठून पोचेल. हे थांबविले नाही, तर सरकारलाच ऑफलाइन करू. यवतमाळच्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असा निर्णय घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गुन्हा दाखल करावा. गुजरातमध्ये सरकार जरी आले असले, तरी ग्रामीण भागात भाजपला नाकारले आहे हे लक्षात ठेवायला हवे. यावेळी एस. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले. प्रदीप पाटील यांनी सात ठराव एकमुखी मंजूर केले. लोकेश लाटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रमाकांत धनगर यांनी आभार मानले.

Web Title: chopada news Farmers are killed by the governments policy