चांगले काम करणाऱ्याचे नागरिक नाव काढतातच - जिल्हाधिकारी पांढरपट्टे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

धुळे - महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील ‘लाल दिवा’ काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन व जनतेतील अंतर कमी होण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागतच करायला हवे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव नागरिक नक्कीच काढतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.

नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे, भारतीय स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक रवी नायडू उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, की आपणही सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण स्वतःला वेगळे का समजावे?, त्यामुळे आपण आता लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण नागरिकांमध्ये गेले पाहिजे, त्यांच्यात रमले पाहिजे. चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव जनता नेहमीच काढते. देवमामलेदार हे त्यापैकीच एक उदाहरण आहे.   

श्री. हुलवळे, आयुक्त धायगुडे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक रवी नायडू, नितीन ठोके, कृषी उपसंचालक बी. के. वरघडे, शिरपूरचे तहसीलदार महेश शेलार, वनपाल के. डी. देवरे, बाळू भामरे, कृषी सहाय्यक एम. सी. पाटील, मनोज पाटील, पी. बी. मोरे, सहाय्यक लेखाधिकारी सुनील मते, डॉ. हर्षदा पवार, निरीक्षक सी. डी. बागूल यांचा आपापल्या क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The citizen of the good working person does the name