PHOTOS : तब्बल तासभर चालली चित्तथरारक झुंज...बिथरलेल्या नागरिकांनी केले 'असे'....

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 1 January 2020

दोघांचीही शरीरयष्टी जवळपास सारखीच... दोघेही तगडेतुगडे अन्‌ शिंगेही अगदी धारधार... त्यांच्यात रंगलेला सामना दोन अट्टल पहिलवानांसारखा... असे दोन मोकाट वळू शहरातील सराफ बाजार, जब्रेश्‍वर खुंट परिसरात भररस्त्यात एकमेकांना भिडले गेले... या वळूंच्या झुंजीने काय चित्तथरारक नजारा दृष्टिक्षेपात पडतो हे येवलेकरांनी अनुभवले...

नाशिक : दोघांचीही शरीरयष्टी जवळपास सारखीच... दोघेही तगडेतुगडे अन्‌ शिंगेही अगदी धारधार... त्यांच्यात रंगलेला सामना दोन अट्टल पहिलवानांसारखा... असे दोन मोकाट वळू शहरातील सराफ बाजार, जब्रेश्‍वर खुंट परिसरात भररस्त्यात एकमेकांना भिडले गेले... या वळूंच्या झुंजीने काय चित्तथरारक नजारा दृष्टिक्षेपात पडतो हे येवलेकरांनी अनुभवले... एकमेकांना सरस ठरणारे दोन वळू एकमेकांना चांगलेच खेटताना त्यांच्यातील तब्बल तासभर चाललेली झुंज अन्‌ एकमेकांना धडका देताना गुंजणारा टकरांचा आवाज असे सर्व काही लक्ष वेधून घेणारे ठरले. 

No photo description available.

नागरिकांची चांगलीच धावपळ...

शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या जब्रेश्‍वर खुंट, सराफ बाजारात दोन मोकाट वळूंची सुमारे एक तास ही झुंज सुरू असताना जागा सापडेल त्या ठिकाणी वळू सैरावैरा धावत असल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शहराच्या गल्लोगल्ली आपल्याच तोऱ्यात वावरणारे अनेक वळू शहरातही आहेत. कधी भाजीमंडई, तर कधी भर बाजारातील या मोकाट वळूंची मस्ती आजवर अनेकदा दृष्टिक्षेपात पडताना अचानक आमनेसामने ठाकलेल्या दोघा वळूंची झुंज सर्वांचेच लक्ष वेधून गेली. ही काही कुठली कुणी लावलेली स्पर्धा नव्हती, तर वळू एकमेकांवर गुरकावताना एकमेकांना शह देण्यासाठीची अचानक सुरू झालेली लढाई होती. कुस्तीच्या आखाड्यात मल्ल एकमेकांशी लढताना अधूनमधून जसा एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतात तसाच अंदाज एकमेकांच्या डोक्‍याला डोके भिडवत, नजरेला नजर रोखताना या दोन वळूंमध्ये झालेली ही झुंज प्रत्येकाचेच लक्ष वेधून गेली. आजूबाजूला उभ्या असलेल्या गल्लीतील प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकविताना तब्बल तासभर चाललेल्या या वळूंच्या झुंजीने मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या अनेकांना थबकायला लावले. कधी दोन पावले मागे सरकताना आता झुंज थांबली, असे वाटत असतानाच पुन्हा जोरदार आक्रमण करीत पुढे सरसावणारे दोघेही वळू... त्यांच्या जोरदार टकरांनी ही झुंज चांगलीच चित्तथरारक ठरली.

हेही वाचा > पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!

Image may contain: outdoor

दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नव्हतं..

दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसलेल्या या वळूंच्या लढाईत अखेर कुणाचीही जित न होता दोघेही सरस ठरले अन्‌ बराच वेळ चाललेली भर रस्त्यावरील वळू चांगलेच आक्रमक झाल्याने कुतूहलाने मनोरंजन म्हणून वळूंची झुंज पाहणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले. आक्रमक झालेले वळू काही नुकसान करण्याआधीच नागरिकांनी त्यांना काठीच्या धाकाने हाकलण्यास सुरवात केली. परंतु बैलाची झुंज काही थांबत नाही पाहून नागरिकांनी त्या ठिकाणी फटाके वाजवून तसेच त्या वळूंच्या अंगावर पाणी टाकून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. जैन मंदिरापासून सुरू झालेली ही लढत वळूंनी एकमेकाला धडका देत बालाजी गल्लीपर्यंत आल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दोघांपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर एक तासाच्या कलावधीनंतर ही झुंज आटोक्‍यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

हेही वाचा > छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen was shocked by the fight of the bulls Yeola Nashik Marathi News