PHOTOS : सावधान! 'त्यांची' टोळी आसपासच आहे....'इथल्या' लहान मुले व महिलांमध्ये घबराट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

शहर व ग्रामीण भागातही त्यांचा वावर वाढू लागल्याने लहान मुले, महिला व एकटे असण्याची भीती नागरिकांना सतावू लागली आहे. यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. या कुत्र्यांपासून नुकसान होऊ नये म्हणून अनेक घरांच्या समोर व शेतात लाल पाण्याच्या बाटल्या भरून या कुत्र्यांना दूर ठेवण्याचा नागरिकांचा व शेतकऱ्यांचा प्रयत्न असायचा. परंतु गेल्या काही दिवसांपासून या लाल बाटलींनाही ते जुमानत नाहीत.

नाशिक :  देवळा परिसरात भटक्‍या व मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर व ग्रामीण भागातही त्यांचा वावर वाढू लागल्याने लहान मुले, महिला व एकटे असण्याची भीती नागरिकांना सतावू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. 

पोल्ट्रीफार्मच्या आसपास टोळकी; पिकांचे नुकसान 
गेल्या महिन्यापासून अचानक येथील मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याने व ते झुंडीने फिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वी या कुत्र्यांपासून नुकसान होऊ नये म्हणून अनेक घरांच्या समोर व शेतात लाल पाण्याच्या बाटल्या भरून या कुत्र्यांना दूर ठेवण्याचा नागरिकांचा व शेतकऱ्यांचा प्रयत्न असायचा. परंतु गेल्या काही दिवसांपासून या लाल बाटलींनाही ते जुमानत नाहीत. शेतातील पिकांचे नुकसान हे कुत्रे करीत असल्याने हे एक नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना हे कुत्रे आक्रमक होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना बाहेर पडणे धोक्‍याचे झाले आहे. 

Image may contain: dog and outdoor

कुत्र्यांमुळे छोटे-मोठे अपघात​
वर्दळीच्या रस्त्यावर ही कुत्र्यांची झुंड अचानक पळत सुटतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या भागात पोल्ट्री उद्योग चालविला जातो. काही वेळा मृत झालेल्या कोंबड्या फेकून दिल्या जातात. त्यामुळे असे काही कुत्रे पोल्ट्रीच्या जवळपास रेंगाळत असतात. मांस खाण्याची सवय झाल्याने कुत्र्यांची अशी टोळी एकट्या शेळीवर तुटून पडतात. त्यामुळे कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

Image may contain: one or more people, people walking, outdoor and nature

हेही वाचा > "शव दफन नाही दहन करणार आम्ही"...पण हा बदल केलाय कोणी?

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
"या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर नाईलाजास्तव शेतकऱ्यांना पुढची पावले उचलावी लागतील. कारण अस्मानी, सुलतानी संकटांबरोबर आता हे कुत्र्यांचे नवीनच संकट निर्माण झाले आहे. याबाबत दखल घेण्याची गरज आहे. - अशोक रौंदळ, भेंडी (ता. कळवण) 

Image may contain: one or more people, dog, outdoor and nature

वाचा सविस्तर > रोपांना पाणी देताना...पायाखाली अकरा हजार वोल्टेजचा मृत्यू साक्षात होता...अन् मग..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are Annoyed by the increasing number of street dogs Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: