आता प्रतीक्षा उन्हाची! 

योगेश बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

मालेगाव : गेल्या आठ दिवसापासून शहरात ऊन गायब झाले आहे. रोगराई जाण्यासाठी आता नागरिक कडक उन्हाची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. तालुक्यासह शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यात प्रत्येक कॉलनी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. साथीच्या आजारांनी तर शहरात थैमान घातले आहे.

मालेगाव : तालुक्यासह शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यात प्रत्येक कॉलनी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. साथीच्या आजारांनी तर शहरात थैमान घातले आहे. रोज दिवस उजाडला की पाऊस अन ढगाळ वातावरण त्यामुळे साथीच्या आजारांना पूरक वातावरण मिळत आहे. तसेच ग्रामीण भागात काढणीला आलेल्या पिकांच्या कापणीसाठी देखील पाऊस उघडीक देत नसल्याने शेतकरी पाऊस उघडण्याची वाट बघत आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात ऊन गायब झाले आहे. रोगराई जाण्यासाठी आता नागरिक कडक उन्हाची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. 

सद्याच्या परिस्थितीवर उपायोजना काय?

शहरातील बहुतांश रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यात रोज पडणारा पाऊस व वाहणारे पाणी चिंतेचा विषय बनले आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण अन काही क्षणात मुसळधार पाऊस असे समीकरण रोजचे बनले आहे. रोजची वस्त्र वाळणे देखील कठीण होऊन बसले आहे. शहरातील सर्व रुग्णालये साथीच्या आजारांच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे कडक ऊन पडणे गरजेचे आहे. सध्या शहरात निवडणुकीपेक्षा रस्त्यावरील खड्डे व साचलेले पावसाचे पाणी यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र यावर उपायोजना काय? असा सवाल नागरिकाककडून विचारण्यात येत आहे.

सोशल मीडियावर जा रे जा रे पावसा...

गेल्या पंधरा दिवसापासून शहरासह परिसरात पावसाची हजेरी आहे. ऊन गायब झाले आहे. त्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. कपडे सुकने देखील जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेकानी सोशल मीडियावर असे लिहुन पाठविले आहे
'जा रे जा रे पावसा 
तुला देतो पैसा 
पैसा झाला खरा'
आत्ता तू गेलेला च बरा'

प्रतिक्रिया 
सध्या शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. साचलेले पावसाचे पाणी, आणि ढगाळ वातावरण यामुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रोज येणाऱ्या रुग्णांमध्ये लहान बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता कडक ऊन पडणे गरजेचे आहे. जेणेकरून रोगराईचे नायनाट होईल. 
- डॉ. सचिन बोरसे, पानाई क्लीनिक, सोयगाव

साचलेल्या पाण्यामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. त्यात येत्या रविवारी घटस्थापना होणार असल्याने घरातील भांडे, कपडे आवरण्याची लगभग आहे. मात्र पाऊस उघडीक देत नाहीत.आणि कडक उन्हाअभावी कामे रखडली आहेत.
- विद्या बच्छाव, गृहिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens are waiting for hot sun