जिल्हा अग्रणी बॅंकेतर्फे २७४ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप

लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे आदेश देताना आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद पाटील आदी.
लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे आदेश देताना आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद पाटील आदी. esakal

नंदुरबार : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा अग्रणी बॅंकेतर्फे नंदुरबार व तळोदा येथे कर्ज लाभार्थींचे मेळावे घेण्यात आले. त्यात नंदुरबार येथे २०५ तर तळोदा येथे ६९ जणांना कर्ज मंजुरीचे आदेश आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे आदेश देताना आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद पाटील आदी.
विजेपासून बचावासाठी ‘दामिनी ’ॲपचा वापर करावा

नंदुरबार येथील गिरीविहार गेट येथील वाडीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांना बॅंकाचा विविध कर्ज योजना व कर्ज मंजूर लाभार्थ्यांना आदेश पत्राचे वाटप कार्यक्रम झाला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री,एसबीआय चे विभागीय व्यवस्थापक सुजितकुमार साह, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद पाटील उपस्थित होते.

या मेळाव्यात बॅंकातर्फे कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. त्यात गृहकर्ज २२ जणांना तीन कोटी २३ लाख ,बचत गट व कृषी कर्ज १४४ लाभार्थ्यांना चार कोटी २१ लाख तर इतर मध्ये ३९ जणांना एक कोटी २३ लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच तळोदा येथे आदिवासी सांस्कृतिक भवनात हा मेळावा झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी ६९ लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे आदेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यात कृषी कर्ज ४७ जणांना तर २० महिला बचत गटांना व इतर दोन जणांचा समावेश आहे.

लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे आदेश देताना आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद पाटील आदी.
नंदुरबार : पालिकेतर्फे प्लॅस्टीक विक्रेत्यांवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com