शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील - आमदार डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

एरंडोल - शहरातील सर्व प्रभागांमध्ये विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न करून शहर विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी येथे सांगितले.

शहरातील मुल्लावाडा परिसरात आमदार निधीतून मुस्लिम समाज बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.  नगराध्यक्ष रमेश परदेशी अध्यक्षस्थानी होते. 

आमदार डॉ. पाटील पुढे म्हणाले, की मतदारसंघात विकासकामे करताना कोणताही भेदभाव केलेला नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पालिका निवडणुकीत मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. नगराध्यक्ष परदेशी यांनी पाच वर्षात शहरात विविध विकासकामे करून शहराचे रुप बदलवणार असल्याचे सांगितले. शहर हागणदारीमुक्‍त करण्यासाठी पालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत.

आगामी काळात शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता यासाठी नियोजन करून प्रयत्न करण्यात येणार आहे. शहराचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करण्यात येईल. असे सांगितले. यावेळी मुल्लावाडा परिसरात सुमारे दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन आमदार डॉ. सतीश पाटील यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जहिरुद्दीन शेख कासम, नगरसेवक अभिजित पाटील, योगेश महाजन, डॉ. सुरेश पाटील, असलम पिंजारी, ॲड. नितीन महाजन, मोमीन शकूर, नगरसेविका वर्षा शिंदे, डॉ. नरेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, दशरथ चौधरी, चिंतामण पाटील, अश्‍पाक बागवान, बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे, सहायक अभियंता आनंद दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र देसले, रामधन पाटील, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, रवींद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस आर. डी. पाटील यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: The city's overall development efforts ever