'सिव्हिल'मध्ये रंगली कैद्याची पार्टी

'सिव्हिल'मध्ये रंगली कैद्याची पार्टी

जळगाव - खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या संशयित आरोपीला प्रकृती खराब झाल्याचे सांगून जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, संबंधित संशयित आरोपीच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डातच काल मद्यप्राशन करीत रात्री जोरदार पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संशयित आरोपीला पोलिसांनी हटकल्यानंतर त्याने पोलिसांशीही वाद घातल्याने आज दिवसभर रुग्णालयात या पार्टीची जोरदार चर्चा होती. 

खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेला चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या प्रकृती खराब झाल्याचे सांगून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला आहे. काल सायंकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कैदी वॉर्ड असलेल्या (वॉर्ड नंबर 9) मध्ये इतर कैदी असताना चेतनने मित्रांनाही तेथे बोलावून मद्यप्राशन करून जोरदार पार्टी केली. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयासह पोलिस दलाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पोलिस कर्मचाऱ्याने हटकले 
रुग्णालयातील कैदी वॉर्डाजवळ ड्युटीवर असलेल्या पोलिसाने पार्टी सुरू असताना संबंधितांन हटकल्याने मद्याच्या नशेतील तरुणांनी पोलिसाशी हुज्जत घालून वाद घालण्याचा प्रयत्न केला. 

कैदी वॉर्डातील मौजमजा 
कारागृहात असलेल्या कैद्यांकडून पैशांच्या जोरावर जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टरांना "मॅनेज' करून उपचाराच्या नावाखाली कैदी वॉर्डात "ऍडमिट' करवून घेतले जाते. गेल्याच आठवड्यात पोटात ऍपेंडिक्‍स फुटलेल्या कैद्याला दाखल करण्यावरून आर्थिक लागेबांधे उघड झाले होते. काल रात्री जिल्हा रुग्णालयातील गच्चीवर झालेल्या या पार्टीने पुन्हा ही बाब अधोरेखित केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत रुग्णालयात जोरदार चर्चा असून, वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पार्टीबाबत दुजोरा दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com