नंदुरबारमध्ये एमआयएमच्या सभेत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

या सभेत कार्यकर्त्यांमध्ये काही मुद्यांवरून वाद झाला. त्यानंतर दोन गटात हाणामारी सुरू झाली. यात फरीद पठाण गंभीर जखमी आहेत, तर समीर शेख हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदुरबार - नंदुरबारमध्ये एमआयएम पक्षाच्या सभे दरम्यान दोन गटातील वादामुळे झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत.

नंदुरबारमधील गरीब नवाज कॉलनी परिसरात एमआयएमने सभा घेतली होती. नंदुरबार जिल्हयात नगरपालिका निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश मिळाले होते. त्यांचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काल रात्री शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात प्रदेश अध्यक्ष आणि काही नेत्याचा उपस्थित सभा झाली.

या सभेत कार्यकर्त्यांमध्ये काही मुद्यांवरून वाद झाला. त्यानंतर दोन गटात हाणामारी सुरू झाली. यात फरीद पठाण गंभीर जखमी आहेत, तर समीर शेख हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव कमी झाला.

Web Title: clash in MIM meeting at Nandurbar