देवीच्या वर्गणीचा हिशोब मागितल्याने हाणामारी; 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल

दीपक कच्छवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) : भवानी मातेची मंदिरात  मूर्तीची स्थापना होण्यापुर्वीच वर्गणीचा हिशोबावरून नुकतीच  दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना धामणगाव (ता.चाळीसगाव) येथे घडली असुन 15  जणांविरूध्द मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) : भवानी मातेची मंदिरात  मूर्तीची स्थापना होण्यापुर्वीच वर्गणीचा हिशोबावरून नुकतीच  दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना धामणगाव (ता.चाळीसगाव) येथे घडली असुन 15  जणांविरूध्द मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धामणगाव येथील गावाच्या बाहेर नुकतेच भवानी मातेचे मंदिर बांधण्यात आले आहे. भवानी मातेची मूर्तीची उद्यापन करून मुर्ती स्थापन कार्यक्रम  चैत्र शुद्ध पौर्णिमेला होणार होता. त्यापुर्वीच आज सायंकाळी चारच्या सुमारास मंदिराजवळ असलेले देवीदास आबासाहेब जगताप यांनी देवीच्या वर्गणीचा हिशोब मागितला त्याचा राग येवुन व गैर कायद्याची मंडळी जमवुण हातात लाठ्या, काठ्या कुऱ्हाडी घेवुन देविदास जगताप यांना मारहाण केली. या प्रकरणी देविदास जगताप यांनी दिलेल्या तक्ररारीवरून दिलीप जगताप, अनिल जगताप, मधुकर जगताप, राहुल जगताप,गणेश जगताप, दिनेश जगताप, शालिक जगताप, विलास जगताप,अनिल जगताप सुनिल जगताप, रमेश जगताप, दिनेश जगताप, नाना जगताप विजय जगताप, ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास पाटील हे करीत आहेत.या घटनेत विनोद जगताप, नाना जगताप, प्रमोद जगताप देविदास जगताप मनोज जगताप यांना मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.नौसिन खान यांनी दिली.तर दुसर्‍या गटाचे चाळीसगाव येथे जाब जबाब घेण्यात आले.

Web Title: clash in two groups in dhamangaon