बाजार समितीच्या बैठकीत शेतकरी सुकाणू समिती अध्यक्षांनी अंगावर टाकले रॉकेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामातील 21जानेवारीनंतरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत बिल आहे. थकीत रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, यासाठी शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी 4 मेपासून उपोषण करणार होते.

चोपडा : शेतकऱ्यांचे थकीत बिल देण्याबाबत आज सकाळी बाजार समितीत सुरू असलेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य एस बी पाटील यांना रडू कोसळले. त्यांनी उद्विग्न होऊन पक्षीय नेत्यांसमोर अंगावर रॉकेल ओतून घेतले.

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामातील 21जानेवारीनंतरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत बिल आहे. थकीत रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, यासाठी शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी 4 मेपासून उपोषण करणार होते. मात्र सर्व पक्षीय नेते, चोसाकाचे चेअरमन, संचालक यांनी कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील व शेतकऱ्यांशी सकाळी बाजार समितीत चर्चा केली. 

या समितीमध्ये 8 मेपर्यंत बिलाची व्यवस्था करणे व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी व इतर गोष्टींसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी वेळ मागितला होता. यावर सदर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र या संदर्भात आज (ता. 9) सकाळी दहा वाजता बाजार समितीत विधानसभेचे माजी अध्यक्ष
अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, चेअरमन अतुल ठाकरे, संचालक जितेंद्र पाटील व कृती समिती सदस्य एस. बी. पाटील,
संचालक,आनंदराव रायसिंग, जितेंद्र पाटील व कृती समिती सदस्य एस. बी. पाटील, शेतकरी संजीव सोनवणे, नितीन पाटील (माचले), विजय रजाळे (घोडगाव), मुकुंद पाटील (चहार्डी), तुकाराम पाटील (पंचक), नितीन निकम (माचले) , गोविंदा दामू चौधरीम (चहार्डी) , गुलाब पाटील सोबत तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी शेतकऱ्यांना चोसाकाकडून ऊसाचे बिल मिळत नसल्याने व काही एक निर्णय होत नसल्याने उद्विग्न होऊन बैठकीत एस. बी. पाटील यांनी नेत्यांसमोर अंगावर ओतले रॉकेल ओतले व आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

चहार्डी (ता. चोपडा) येथील चोसाकाने शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलाचे पैसे काट्याखाली देण्याची बोली करूनसुद्धा तीन महिने उलटल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने संतापलेले शेतकऱी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस. बी. पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत आणलेल्या रॉकेलच्या बाटलीमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. यावेळी पाटील यांचे हे कृत्य पाहूनही सर्वपक्षीय नेते गुजराथी व पाटील हे भांबावले होते. चोसाकास तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता. त्यांना पैसे देण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते चेअरमन आणि शेतकरी यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सुरू असताना सकाळी दहा वाजता हताश झालेले शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस बी नाना पाटील यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या डोळ्यासमोर पैसे मिळणार नसल्याचे समजल्याने अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर मात्र स्वतः अरुणभाई गुजराथी आणि कैलास पाटील यांनी एस. बी. पाटील यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातील बाटली काढून घेतले. यावेळी थोडा वेळ तारांबळ उडाली.

गुजरार्थींचा संताप 
यावेळी आम्ही रक्ताचे पाणी करीत आहोत, शेतकऱ्यांसाठीच करीत आहोत. थोडाफार वेळ देणार की नाही अंगावर रॉकेल टाकले असे कधी झाले आहे का ? 2/4 दिवसांसाठी असा प्रकार करणे 100 टक्के चुकीचे आहे. साखरवाला, मोलसेसवाला माल उचलत नाही. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही पैसे उभे करण्याची प्रयत्न करीत आहोत. ही पद्धत बरोबर नाही एकंदरीत घडलेला प्रकार बरोबर नसल्याचे संतापलेल्या गुजराथी यांनी सांगितले.

Web Title: clashes in bajar samiti meeting sukanu samiti chairman