शिक्षकांनी वर्गणी काढत वर्गखोली केली डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवे जामदे जिल्हा परिषद शाळा - शिक्षक परिषदेचे नांद्रे यांचा पुढाकार

धुळे - लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू असताना शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांनी स्वतःच्या वेतनातून सुमारे ४५ हजाराची रक्कम जमा करीत वर्गखोली डिजिटल करीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे यांच्या प्रयत्नातून नवे जामदे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

खुडाणे केंद्रांतर्गत असलेल्या या शाळेतील डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन माजी उपसभापती किरण बच्छाव यांच्या हस्ते झाले. गटशिक्षणाधिकारी भिल, डाएटच्या अधिव्याख्याता डॉ.बेलन, शिक्षणविस्तार अधिकारी बागूल, केंद्रप्रमुख श्रीमती निकम, शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, नवेजामदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपेश पवार, सरपंच रिंजन चव्हाण, गोपी भोसले, शरद पवार, हिम्मत पवार, खोरीचे श्री शिंदे, माजी उपसरपंच सुनील शिंदे तसेच खुडाणे केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

डिजिटल वर्गखोलीच्या उद्‌घाटन समारंभानंतर खुडाणे केंद्रात शिक्षण परिषद झाली. या परिषदेचे नियोजन जिल्हा परिषद शाळा खोरी आणि नवे जामदे यांनी केले होते. या परिषदेवेळी सुनील जाधव यांनी ‘ब्लॉग निर्मिती’ कशी करावी आणि ‘तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर कसा करावा’ याबाबत मार्गदर्शन केले. राम भलकारे व गोविंद पाडवी यांनी ‘गणितातील संबोध व गणित’ विषयावर मार्गदर्शन केले. योगेश हालोर यांनी ‘भाषेतील वाचन कौशल्य विकसित करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक युवराज बागूल आणि सहकारी शिक्षक तसेच खोरीचे मुख्याध्यापक मोहिते आणि शिक्षकांनी केले. प्रशालेचे शिक्षक जयसिंह भुईटे व शरद पवार यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जाधव यांनी केले.

Web Title: classroom digital by teacher