स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाऴांचे स्वच्छ सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

खामखेडा  - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांचे आदेश असल्याने पंचायत समिती देवळा शिक्षण विभागाच्या वतीने स्वच्छता विषयक केल्या जात असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. शाळा निहाय १ ते ४ आगस्ट दरम्यान घेण्याच्या सूचना असल्याने येत्या चार दिवसात सर्व शाळांना क्षेत्रीय अधिकाऱ्या मार्फत शाळा भेट घेत अमलबजावणीचे नियोजन केले असल्याचे गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी सांगितले.

नागरिकांचा स्वच्छता अभियानात अधिक मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग वाढावा, व त्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्यापक पातळीवर जनजागृती करण्यावर भर देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश असल्याने त्यानुसार देवळा तालुक्यातील शाळांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अप्लिकेशन मध्ये शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सद्ष्यानी सहभाग नोंद्वण्यासाठीचे नियोजन करण्यात येत प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु असल्याचे गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी सांगितले.

त्याच बरोबर शाळा भेटीत अध्ययन स्तर निश्चिती उपक्रमानुसार भाषा गणित व इंग्रजी विषयांचे वर्गवार चाचणी, दैनिक नियोजनाप्रमाणे शाळा प्रगत अप्रगत मुलांची संख्या, नियोजनाचे स्वरूप, डिजिटल शाळा, डिजिटल साहित्य यांचा अध्यापनात प्रभावीपणे वापर होतो किंवा नाही.त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार मध्यान्न भोजन योजना, धन्यादी  मालाचा पुरवठा, भांडारगृह व तेथील स्वच्छता स्वयंपाकाची भांडी, सतत गैरहजर विद्यार्थ्यां, शाळा बाह्य मुले पटावर दाखल केले की नाही याबाबतची माहिती, मोफत गणवेश योजना,स्वच्छते संदर्भातील शाळेच्या परिसराच्या, स्वच्छतागृह मुलामुलींची स्वच्छतागृह व त्यांचा वापर. वैयक्तिक स्वच्छतेत विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या संदर्भात शिक्षकांना सूचना करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत केंद्रप्रमुख दिलीप पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर व हनुमाननगर शाळेत भेट दिली. प्रत्यक्ष शिक्षकांकडून माहिती नोंदवून घेतली व शिक्षकांनी पालकांकडूनही याच पद्धतीने माहिती घ्यावयाच्या सूचना शिक्षकांना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते साहेबांचा शाळा तेथे शेवगा या उपक्रमांतर्गत फांगदर शाळेच्या शेवगा लागवड केलेल्या ठिकाणी भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ, अनंत देवरे व उपशिक्षक सोमनाथ शिवले, खंडू मोरे उपस्थित होते.

शिक्षकांना शेवग्याच्या झाडाचे फायदे विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. कुपोषण निर्मुलनासाठी शेवग्याचे फायदे अधिक असल्याने प्रत्येक शाळेत शेवगा लागवड झाली आहे. 
सुनिता धनगर, गटशिक्षण अधिकारी देवळा

Web Title: Clean survey of schools under Clean India Mission