मुख्यमंत्र्यांच्या तोतया पीएला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मालेगाव (जि. नाशिक) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहायक (पीए) असल्याची बतावणी करून जऊळका रेल्वे येथील शिवाजी विद्यालयाची तपासणी करणाऱ्या तोतयाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार शनिवारी घडला. मंगेश मारोतराव तलमले (रा. पुलगाव, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस आज न्यायालयाने पाच डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आमदार अमित झनक यांच्या संस्थेद्वारे संचालित जऊळका रेल्वे येथे श्री शिवाजी विद्यालय आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोटारीने एक व्यक्ती या शाळेत आली. मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्वीय सहायक असल्याचे त्याने सांगितले. या शाळेची चौकशी करण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगितले. आरोपीच्या एकंदर वागणुकीवरून तो तोतया असल्याचा संशय बळावल्याने त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. यावर तो संतप्त झाला. दरम्यान, एका शिक्षकाने रेल्वे पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तोतया पीएला अटक केली. त्याचे नाव मंगेश तलमले असल्याचे समजते.

Web Title: CMs imposter PA arrested