PHOTO : 'तो' भेटत नव्हता...म्हणून गेले पंधरा दिवस घरचे तणावाखाली होते.. पण अचानक देवघरापाशी..

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते. पुन्हा सकाळी सहाच्या सुमारास शिरसाट यांच्या पत्नी ज्योती शिरसाट यांना देवघरात वळवळ जाणवली. त्यांनी निरखून पाहिले असता, तो साप असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील सदस्यांना बोलावले.

नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते. बुधवारी (ता. ४) पुन्हा सकाळीस सहाच्या सुमारास शिरसाट यांच्या पत्नी ज्योती शिरसाट यांना देवघरात वळवळ जाणवली. त्यांनी निरखून पाहिले असता, तो साप असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील सदस्यांना बोलावले

अशा पध्दतीने सापडला...

विंचूर येथील संदीप शिरसाट यांच्या घरातील सदस्य गेल्या दोन आठवड्यांपासून तणावाखाली वावरत होते. बुधवारी (ता. ४) पुन्हा सकाळीस सहाच्या सुमारास शिरसाट यांच्या पत्नी ज्योती शिरसाट यांना देवघरात वळवळ जाणवली. त्यांनी निरखून पाहिले असता, तो साप असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील सदस्यांना बोलावलेघरात सुमारे चार फूट लांबीच्या कोब्रा जातीच्या नागास लासलगाव येथील सर्पमित्र अनिश सय्यद व आदील शेख यांनी पकडून बोकडदरे येथील वन विभागाच्या जंगलात सोडले. शिरसाट यांच्या घरात २० नोव्हेंबरला सर्प निदर्शनास आला होता. तो अचानक दिसेनासा झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. . सर्वांनी सापावर बारकाईने लक्ष ठेवले. उपस्थितांनी लासलगाव येथील सर्पमित्र अनिश सय्यद व आदिल शेख यांना बोलविले. त्यांनी सापाला पकडले व छिद्रे पाडलेल्या बरणीत टाकले. सर्पमित्र सय्यद यांनी कोब्रा जातीचा अत्यंत विषारी नाग असल्याचे सांगितले. येवला वन विभागास माहिती देऊन बोकडदरे येथील वन विभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले. सर्पमित्र सय्यद यांनी कोणाच्याही घरात अथवा परिसरात साप किंवा नाग आढळल्यास घाबरून जाऊ नका व त्याला मारू नका. फक्त त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा आणि आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्यास धरून जंगलात सोडून देऊ, असे सांगितले.  

Image may contain: one or more people and outdoor

 कोब्राला जंगलात सोडताना सर्पमित्र अनिश सय्यद. 

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

 सर्पदंश कसा टाळावा...ही घ्या काळजी...

(१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. 
(२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे; त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. 
(३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते.
(४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. 
(५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. 
(६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. 
(७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये.
(८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. 
(९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत

Image may contain: one or more people

हेही वाचा > ती विवाहीत..अन् तिच्यापेक्षा वयाने लहान प्रियकराच्या प्रेमात पडली..नंतर..

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cobra caught by a snake mate at Nashik Marathi News