थंडीचा कडाका आणखी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

तापमान 6.2 अंशांवर - बालके, वृद्धांसह सर्वांनी घ्यावी काळजी

धुळे - शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा काल (ता. २७) ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. आजही ६.२ अंश तापमान नोंदले गेले. सर्वत्र गारठा वाढला आहे. शाळा-महाविद्यालयांतील उपस्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, थंडीचा कडाका आगामी आठवड्यात वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वातावरणात गारठा निर्माण झाल्याने सर्दी, खोकला आणि तत्सम शारीरिक व्याधींनी अनेकजण त्रस्त झाले आहेत. घटलेल्या तापमानाचा परिणाम लहान बालके आणि वयोवृध्दांवर जास्त प्रमाणात होत आहे. 

शहरासह जिल्ह्याच्या तापमानामाचा पारा या आठवड्याच्या सुरूवाती पासून घसरण्यास सुरवात झाली. एरवीही ४५ अंश सेल्सिअसची उष्णता सहन करणाऱ्या धुळेकरांना एवढा गारठा अनुभवण्याची वेळ येईल, याची कल्पनाही नाही. आठवड्याच्या सुरवातीला पारा १० अंश सेल्सिअस पर्यंत घसरला होता. त्यानंतर मात्र दररोज पारा घसरत चालला आहे. बुधवारी कृषी महाविद्यालयाच्या तापमापन केंद्रात सकाळच्या तापमानाची नोंद ६.२ अंश सेल्सिअस इतकी झाली. अचानक शहर गारठल्याचा अनुभव सारे जण घेत आहेत. 
 
‘जिल्ह्याचे अचानक तापमान कमी झाल्याने त्याचा परिणाम सर्वांवरच होतो. विशेषतः नवजात बालकांवर जास्त होतो. त्यांना उबदार वातावरणात ठेवावे. लोकर किंवा सुती कापडापासून तयार केलेले कपडे घालावेत. ज्येष्ठांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, पायमोजे, हातमोजे घालावे. गरज नसेल तर गार वातावरणात घराबाहेर पडू नये. थंडीमुळे व्हायरल इन्फेक्‍शनही वाढते. दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. या काळात कुणीही शिळे अन्न अजिबात खाऊ नये. शक्‍यतो गरम दूध, चहा, कॉफी घ्यावी. सर्दी, ताप असल्यास त्वरित डॉक्‍टरांना दाखवावे.
- डॉ. संजय संघवी, जनरल सर्जन, धुळे.

Web Title: cold increase & hard