थंडीची लाट राहणार आठवडाभर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नाशिक - मागील आठवड्यात दहा अंश सेल्सिअसवर गेलेला पारा दोन दिवसांपासून उतरू लागला आहे. यामुळे पुढील आठवडाभर तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा खाली राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

नाशिक - मागील आठवड्यात दहा अंश सेल्सिअसवर गेलेला पारा दोन दिवसांपासून उतरू लागला आहे. यामुळे पुढील आठवडाभर तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा खाली राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मागील तीन दिवसांपासून तापमानात सतत घट होत आहे. काल (ता. 22) किमान तापमान 8.6 अंश सेल्सिअस होते. आज ते 8.3 नोंदविले गेले. पुढील आठवडाभर म्हणजे 28 डिसेंबरपर्यंत तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. यामुळे द्राक्ष बागायतदारांना पुन्हा थंडीपासून बचावासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यानंतर अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे रात्री पाणी देणे, बागेला आच्छादन टाकणे किंवा बागेत शेकोटीसारखे पर्याय शेतकरी अवलंबत असतात. रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांनाही या थडीत पाण्याची एक पाळी देण्याची शिफारस हवामान विभागाने केली आहे. किमान तापमानात घट होत असली, तरी कमाल तापमानात मात्र वाढ झाली आहे. कमाल तापमान काल (ता. 22) 32 अंश सेल्सिअस होते. आज 22 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

Web Title: Cold wave will be a week