थंडीचा कडाका वाढला; रात्रीचा पारा नऊ अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जाणवत असलेला थंडीचा कडाका आणखीनच वाढल्याने जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी भरली आहे. रात्रीचा पारा नऊ अंशांवर आल्याने नागरिक अक्षरशः गारठले आहेत. सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा सायंकाळी अधिकच वाढत आहे. शहराचा दिवसाचा किमान पारा 12 अंशांवर तर रात्रीचा पारा 9 अंशांवर आहे. 

जिल्ह्यासह राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. शहरात सध्या 11 अंश सेल्सिअसच्या पातळीवर तापमानाची नोंद होत आहे. पहाटेपासून सुरू झालेली थंडी दिवसभर जाणवत राहिल्याने अनेक जण स्वेटर घालूनच काम करत आहे. सायंकाळीही रस्त्यांवर कमी गर्दी जाणवत आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने स्वेटर, स्कार्फ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. गारवा पुन्हा जाणवू लागल्याने सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. येत्या काही दिवसात तापमानात अधिकच घट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

सहा दिवसांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
08 डिसेंबर........ 14.0 
09 डिसेंबर......... 13.0 
10 डिसेंबर......... 13.0 
11 डिसेंबर......... 12.0 
12 डिसेंबर.........12.2 
13 डिसेंबर.........12.0

Web Title: Coldness increased in jalgaon