जिल्हाधिकारी कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपये वीजबिल भरणाऱ्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.

नाशिक - महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपये वीजबिल भरणाऱ्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. लवकरच हा परिसर उजळणार असून वीजबिलात लाखभर रुपयांची बचत होणार आहे. टाटा पॉवर सोलरने स्मार्ट-सिटी उपक्रमांतर्गत शुक्रवारी नाशिकला "सोलर रूफ टॉप' मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते उपक्रमाचा प्रारंभ झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Office Solar Power Use