अहो बस थांबवा..कॉलेजला जायचयं..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक : काळखोडे येथे बस थांबत नसल्याने महाविद्यालयील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे. बसमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे या ठिकाणी बस थांबतच नाहीत. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजला दांडी बसते. रोजच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता.२४) सकाळी लासलगाव - मनमाड रोडवर काळखोडे फाटा याठिकाणी बस रोको केला. तसेच ज्यादा बस सोडव्यात अशी मागणी केली . 

नाशिक  : काळखोडे, रेडगाव, वाहेगाव साळ, सालसाने येथून सातशे ते आठशे विद्यार्थी लासलगाव येथे शिक्षणासाठी जातात. ह्या परिसरात लासलगाव हे शिक्षणाबाबत केंद्रबिंदू असल्याने प्राथमिकपासून तर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी बसने मासिक पास काढून प्रवास करतात. परंतु मनमाड ते लासलगावला जाण्यासाठी एकच बस असते. हि बस रायपुर निंबालेवरून पूर्ण विद्यार्थ्यांनी भरून येते वा चांदवडवरून सांगवीमार्गे लासलगावला जाणारी बस हि सोनी सांगवी व काजी सांगवी येथे पूर्ण भरते. यामुळे काळखोडे, रेड्‌गाव, वाहेगाव साळ या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही वा बस ड्रायवर या ठिकाणी बस थांबवत नाही.

 

कॉलेजला जाण्यासाठी ज्यादा बस सोडा

बसमध्ये होणारी कोंडी व दररोजच्या या त्रासामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून कधी शाळेत उशिरा तर कधी गैरहजर रहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता.२४) सकाळी लासलगाव - मनमाड रोडवर काळखोडे फाटा याठिकाणी बस रोको केला. तसेच ज्यादा बस सोडव्यात अशी मागणी केली. तब्बल दोन तासानंतर बस सेवा चालू झाली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, रेडगावचे सरपंच ज्ञानेश्वर काळे, काळखोडेचे बळिराम शेळके, संपत शेळके, रोहित ठाकरे आदी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College students suffer huge loss due to bus not stops at Kalakode