रंगीत गळ्याच्या सरड्याचे नाशिकमध्ये दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नाशिक - रंगीत सरडा पाहायला सर्वांनाच आवडते. निसर्गप्रेमी अशा सरड्याला पाहायला कोल्हापूर, सातारा गाठतात. हाच सरडा नाशिकमध्ये दर्शन देऊ लागलाय. अंगावर सप्तरंग फुलताच त्याचे वैभव प्रकट होत असताना छोट्या डायनासोरची प्रचिती आल्याखेरीज राहत नाही. 

पावसाला सुरवात होत असल्याचे संकेत मिळत असताना हवामानातील बदलातून उकाड्यामधून काहीसा दिलासा मिळू लागलाय. निसर्गप्रेमींच्या भटकंतीला सुरवात झालीय. 

देशाच्या विविध भागामध्ये रंगीत सरडा पाहायला मिळतो. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानमध्येसुद्धा त्याचे वास्तव्य आहे. या सरड्याचे दर्शन विशेषतः वीण काळात म्हणजेच, मे-जूनमध्ये घडते. नर त्याच्या गळ्याचा पिवळा, काळा, लाल रंग घेऊन दगडावर येतो आणि काही वेळात आत जातो. दुसऱ्या नरावर वर्चस्व दाखविण्यासाठी आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्याला ही निसर्गदत्त देणगी मिळालेली आहे. सरडे मोकळ्या मैदानावर राहणे पसंद करतात. या सरड्याची लांबी आठ इंच असून, त्याची शेपूटच पाच इंच आहे. शरीराच्या तुलनेच तीन चतुर्थांश त्याची शेपूट असते. 

Web Title: colorful necklace Chameleon in Nashik

टॅग्स