कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 52 गुन्हेगार गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नाशिक - पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ एक व दोनमध्ये एकाच वेळी अचानक राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 52 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री उशिरा राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत 220 गुन्हे दाखल करण्यात आले. या वेळी पोलिसांनी वाहनचालक, हॉटेल्स, लॉजिंगचीही तपासणी केली. 

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार काल रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील झोपडपट्ट्या, गुन्हेगारांचे अड्डे, हॉटेल्स, बार, लॉजेसची तपासणी करण्यात आली. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 119 गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला असता त्यातील 52 सराईत गुन्हेगार हाती लागले. यात अंबड पोलिस ठाण्यात 21 पैकी पाच, नाशिक रोड पोलिस ठाण्यांतर्गत 16 पैकी तीन गुन्हेगार, तर भद्रकाली पोलिस ठाण्यात 15 पैकी 11 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 67 लॉजिंग पोलिसांनी तपासले. तसेच 31 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर विविध प्रकारच्या 220 केसेस दाखल करण्यात आल्या. कारवाईत परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, मोहन ठाकूर, सचिन गोरे, जयंत बजबळे यांच्यासह पोलिस ठाण्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. 

Web Title: combing operation