बोगस आदिवासी हटविण्यासाठी एकत्र यावे - मधुकर पिचड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

इगतपुरी - आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी व गोरगरीब जनतेला इंग्रज, तसेच सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने केली, लढे दिले. राघोजींचे बंड ही अन्याय व पारतंत्र्याच्या विरोधातील पहिली ठिणगी होती. यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन बोगस आदिवासी मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी केले.       

माजी आमदार शिवराम झोले अध्यक्षस्थानी होते. श्री. पिचड म्हणाले, की इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून, खऱ्या अर्थाने समाजाने चांगले व्यक्तिमत्त्व मिळावे, यासाठी नेहमी प्रयत्न करावेत, तसेच तालुक्‍यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन माजी आमदार झोले यांना तालुक्‍याच्या नेतृत्वाची संधी द्यावी. श्री. झोले म्हणाले, की माजी आदिवासी विकासमंत्री पिचड यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या नावाने बांधलेल्या सभागृहात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यापुढे प्रत्येक वर्षी २ मेस ठाणे कारागृहात आदरांजली वाहण्यात येईल. माजी आमदार पांडुरंग गांगड यांच्या नेतृत्वाखाली आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम झाला. या वेळी आदरांजली वाहण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, लकी जाधव, सोमनाथ घारे, रमेश निसरड, नेहेरे यांच्यासह तालुक्‍यातील व परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

Web Title: Come together to destroy the bogus tribal