आमच्या वडिलांनी आत्महत्या केली, तशी तुम्ही करु नका

दिगंबर पाटोळे
सोमवार, 20 मे 2019

स्ते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने त्यांना सावरण्यासाठी त्यांचे दुख हलके करण्यासाठी आधारतीर्थ आधाराश्रमातील चिमुकल्यांनी बस्ते यांचे सांत्वन केले. यावेळी ''आमच्या पालकाने जी चूक केली, ती तुम्ही करू नका, परिवाराला एकटे सोडू नका, शेतकऱ्यांनो व्यसन करू नका, कुटुंबाला सोडून जावू नका, देवा चांगला पाऊस पडु दे''अशी फलक हातात घेवून हे चिमुकले गावभर फिरत आपल्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.

वणी (नाशिक) : ''नैसर्गिक आपत्ती, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर अशा विविध कारणांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीवर मात करावी'', असे आग्रहाचे आर्जव करीत त्रंबकेश्वर येथील अधारतीर्थ आश्रमातील चिमुरड्यांनी शिंदवड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन केले.

शिंदवड (ता. दिंडोरी येथील प्रकाश निवृत्ती बस्ते यांनी पंधरा दिवसांपूर्वी सततची नापिकी, शेतीमालाला भाव नसल्या कारणाने, डोक्यावरील कर्जाचा बोजा व बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा यामुळे नैराश्यातून प्रकाश बस्ते यांनी विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपवली. बस्ते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने त्यांना सावरण्यासाठी त्यांचे दुख हलके करण्यासाठी आधारतीर्थ आधाराश्रमातील चिमुकल्यांनी बस्ते यांचे सांत्वन केले. यावेळी ''आमच्या पालकाने जी चूक केली, ती तुम्ही करू नका, परिवाराला एकटे सोडू नका, शेतकऱ्यांनो व्यसन करू नका, कुटुंबाला सोडून जावू नका, देवा चांगला पाऊस पडु दे''अशी फलक हातात घेवून हे चिमुकले गावभर फिरत आपल्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. "आमच्या वडीलांनी आत्महत्या केली, तशी तुम्ही करु नका.'' आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे काय हाल होतात हे त्यांनी अनुभवातून व पथनाट्यात ग्रामस्थांसमोर सादरीकरण केले. सदर उपक्रमाचे जर्मन येथील वृतवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले.  

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या या अनाथ मुलांचे आपणभाऊ, बहिण होऊन मदत करु शकतो. या भावनेतून शिंदवड येथील बाळासाहेब बस्ते व राकेश बस्ते यांनी या अनाथ मुलांना जेवनाची 101 ताटे भेट दिली. राकेश यांचा विवाहसोहळा असुनया निमित्ताने त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत अनाथ मुलांचे दुख वाटुन घेण्याचा प्रयत्न केला असुन त्यांचे सर्वांकडुन कौतुक केले जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The comfort of the family of the farmers suicide by orphaned child