आयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा होत नाही. ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाच्या माध्यमातून आयुक्त मुंढे नगरसेवकांवर ‘वॉर’ करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे नगरसेवक व प्रशासनात तुंबळ शाब्दिक युद्ध सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेरण्याची तयारी सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी केली आहे.

साथीचे आजार व परसेवेतील अधिकाऱ्यांना वगळून स्थानिक अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मुद्दे प्रशासनाची कसोटी पाहणारे ठरणार आहेत.

महापालिकेची महासभा उद्या (ता. १९) साडेअकराला होणार आहे. विषयपत्रिकेवर तीनच विषय असले, तरी साथीच्या आजारांवरून प्रथम प्रशासनाला घेरले जाणार असून, विरोधी पक्षांनी तशी जय्यत तयारी केली आहे. आयुक्त ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाच्या माध्यमातून शहराचे कामकाज किती पारदर्शी चालल्याचे दर्शवत आहेत. त्याचाच आधार घेत स्वाइन फ्लू, डेंगीच्या आजाराने शहराची केलेली दयनीय अवस्था प्रशासनासमोर मांडून त्यांना घेरले जाणार आहे. विशेष म्हणजे लक्षवेधी सूचना लवकर दाखल करून न घेणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी साथीच्या आजारांवरील शिवसेनेची लक्षवेधी दाखल करून घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनाला खिंडीत गाठण्याची जोरदार तयारी केली आहे.

स्थानिक विरुद्ध परसेवा वाद
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेत स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी असा सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातच प्रशासनाने ग्रीनफिल्ड प्रकरण तसेच अन्य प्रकरणांत स्थानिक अधिकाऱ्यांना दोषी धरून विभागीय चौकशी लावल्याने त्याची माहिती महासभेवर सादर केली. या मुद्द्यावर प्रशासनाला भाजपच्या बैठकीत यावर चर्चा करण्यासाठी भाजप नगरसेवकांमधील दोन वकिलांना पुराव्यानिशी माहिती सादर करण्याचे फर्मान सोडले आहे.

Web Title: Commissioner Tukaram Munde BJP Opposition Party