गुरव समाजाचा सामूहिक विवाह सोहळा थाटात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

धुळे - गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा आज येथे थाटात झाला. या पहिल्या-वहिल्या सामुदायिक सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. समाजातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे - गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा आज येथे थाटात झाला. या पहिल्या-वहिल्या सामुदायिक सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. समाजातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळातर्फे आज धुळ्यात एकवीरादेवी मंदिर परिसरात गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा झाला. महापौर कल्पना महाले, सोलापूर येथील अपर्णा रामतीर्थकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, मनपाचे स्थायी सभापती कैलास चौधरी, नगरसेवक चंद्रकांत सोनार, गुलाब माळी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, मधुकर गुरव, भीमराव गुरव, सोमनाथ गुरव, सुनील गुरव, राजेश गुरव, भटू गुरव, विनायक गुरव, हेमंत गुरव, राकेश गुरव आदी उपस्थित होते.

जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू
सामुदायिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाहित जोडप्यांना समाजातील दानशूरांनी दागिने तसेच संसारोपयोगी वस्तूंची विवाह भेट दिली. यात प्रत्येक वधूला एक ग्रॅम सोन्याचे मणी- मंगळसूत्र व प्रत्येकी एक पलंग, गॅस शेगडी, स्टील रॅक, कपाट, पाच प्रकारची भांडी आदींचा समावेश होता.

प्रत्येक सोहळ्याला देणगी
विवाह सोहळ्यात नाशिक येथील किरण गुरव यांनी यापुढे समाजाचे असे सामुदायिक विवाह सोहळे झाले, तर अशा सोहळ्याला दर वर्षी ३१ हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. मालेगाव येथील ‘आरटीओ’ सुनील गुरव यांनी विवाहित चारही जोडप्यांना सप्तशृंगगडाच्या सहलीचा खर्च देण्याचे जाहीर केले.

Web Title: Common wedding of Gurav community in Dhule