अडावदला वीज कंपनीची 80 लाख थकबाकी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

अडावद (ता. चोपडा) - वीज कंपनीच्या येथील विभागाची सुमारे 80 लाखांची थकबाकी आहे. यात व्यापारी, पथदिवे, घरगुती व पाणीपुरवठा योजनांचाही सहभाग आहे. थकबाकीदार असलेल्या सुमारे 60 ग्राहकांची वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

अडावद (ता. चोपडा) - वीज कंपनीच्या येथील विभागाची सुमारे 80 लाखांची थकबाकी आहे. यात व्यापारी, पथदिवे, घरगुती व पाणीपुरवठा योजनांचाही सहभाग आहे. थकबाकीदार असलेल्या सुमारे 60 ग्राहकांची वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

अखेर असल्याने वीज कंपनीकडून मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू आहे. चोपडा तालुक्‍यात अडावद हे गाव सर्वात मोठे असून अजून या गावाला वटार, सुटकार, चांदसणी, कमळगाव, रुखनखेडे, उनपदेव, कुड्यापाणी, पिंप्री हा परिसर जोडला आहे. मार्चपासून वीज कंपनीने धडक मोहीम सुरू केली असून पथकातील कर्मचारी रोज सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत गावात व परिसरात खेड्यावर जाऊन ज्या ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे त्यांच्याकडे जाऊन वसुली करीत आहेत. ज्यांनी थकबाकी दिली नाही त्यांचे वीज कनेक्‍शन बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे ग्राहकांचे कनेक्‍शन बंद केले गेले आहेत. 

ग्रामपंचायतीकडे सुद्धा लाखो रुपयांची विजेची थकबाकी आहे. त्यांनाही सुद्धा वीज कंपनीने नोटीस दिली आहे. थकबाकी लवकर भरा नाहीतर वीजपुरवठा बंद करण्यात येईल. परिसरात पथक जाऊन मार्च एन्ड असल्यामुळे धडक मोहीम सुरू आहे. बरेच वीज ग्राहक आपली थकबाकी भरत आहेत. 

येथील वीज कंपनीने 50 ते 60 ग्राहकांचे वीज कनेक्‍शन कायमस्वरुपी बंद केले आहे. त्यांच्याकडे बऱ्याच दिवसाची बाकी होती. त्यामुळे त्यांचे कनेक्‍शन बंद करण्यात आले आहे. 

या धडक मोहीमेत अडावदचे कनिष्ठ अभियंता दिलीप सुंदरणे, उपअभियंता सोनवणे, देवेंद्र पाटील, अशोक लोहार, ए. एच. शहा, सुधीर सोनवणे, वाघ, बेंढाळे, ललित बऱ्हाटे, श्री. शेलकर, किशोर पाटील, सुनील साळुंखे आदी काम पाहात आहेत. 

ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे त्यांनी लवकरात लवकर भरावी. जे भरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे भाग आहे. 
- दिलीप सुंदरणे, कनिष्ठ अभियंता, अडावद. 

Web Title: The company's 80 million outstanding power

टॅग्स