
नाशिकच्या हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील बबनराव महाले यांची मोठी मुलगी पूजा हिचा विवाह १६ मे २०१९ ला येवला येथील शेखर संजय शिंदे याच्याबरोबर कोपरगाव येथे झाला होता. विवाहानंतर पतीचे येवला येथील एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. पतीच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची खातरजमा करून पूजाला असलेला संशय खरा ठरला. याबाबत पतीशी चर्चा करून आपला विवाह झाल्याने तुमचे विवाहबाह्य संबंध संपवा; संबध ठेवू नका, असे वेळोवेळी पूजाने पतीला समजावून सांगितले
नाशिक : पतीच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची तक्रार माहेरी व सासरी केल्याने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी वणी पोलिसांत मुलीच्या वडिलांनी जावई व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
"तू माझ्या नातेवाइकांकडे तक्रार का केली?',
हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील बबनराव महाले यांची मोठी मुलगी पूजा हिचा विवाह १६ मे २०१९ ला येवला येथील शेखर संजय शिंदे याच्याबरोबर कोपरगाव येथे झाला होता. विवाहानंतर पतीचे येवला येथील एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. पतीच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची खातरजमा करून पूजाला असलेला संशय खरा ठरला. याबाबत पतीशी चर्चा करून आपला विवाह झाल्याने तुमचे विवाहबाह्य संबंध संपवा; संबध ठेवू नका, असे वेळोवेळी पूजाने पतीला समजावून सांगितले. याबाबत सासू व नणंद यांनाही माहिती दिली. त्यानंतरही शेखर शिंदेने प्रेयसीबरोबर संबंध ठेवून उलट "तू माझ्या नातेवाइकांकडे तक्रार का केली?', असा दम दिला व शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक देऊन बोलणे बंद केले. प्रेयसीनेही पूजाला फोन करून "तू आमच्या संबंधात येऊ नको; तुला सहा महिन्यांच्या आत शेखर फारकत देणार आहे', असे सांगून अपमानास्पद शब्द वापरून मानसिक छळ केला.
नवविवाहिता पूजा
पती व प्रेयसीने केला पुजाचा मानसिक छळ
दरम्यान, दिवाळीत भाऊबीजेनिमित्त पूजा येवला येथे आली. पूजा सतत मानसिक तणावात असल्याचे जाणवल्याने वडील व कुटुंबाने चौकशी केल्यानंतर तिने पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. 5 नोव्हेंबरला कुटुंबाने पूजाची समजूत काढली. त्यावरून तिनेही पती शेखर याला फोनवरून "झाले गेले विसरून जा', असे सांगितले. तरीही शेखर व्यवस्थित बोलला नाही. 6 नोव्हेंबरला पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास पूजाने हस्तेदुमाला येथे झोपलेल्या खोलीत विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी तिला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर तिची प्रकृती अधिक खालावल्याने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना 9 नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला.
मोबाईलवर टाइप केलेला घटनाक्रम, व्हाइस मेसेजवरून समजले
हस्तेदुमाला येथे माहेरीच पूजाचा अंत्यविधी झाला. नंतर पूजाच्या मोबाईलवर तिने टाइप केलेला घटनाक्रम व नणंद, नंदोईला पाठविलेले व्हाइस मेसेज मिळाले. तिचे वडील बबनराव महाले यांनी सोमवारी (ता. 11) वणी पोलिसांत जावई शेखर शिंदे याने विवाहापूर्वी व विवाहानंतरही येवला येथील युवतीशी अनैतिक संबंध कायम ठेवल्याने, तसेच शेखर शिंदे व त्याच्या प्रेयसीने मानसिक छळ केला. त्यास कंटाळून मुलगी पूजाने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शेखर शिंदे व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.