Dhule News : राज्यातील 108 नद्यांचा ठोस कृती आराखडा लवकरच

Bhat Nadi has been chosen in the campaign Chala januya nadila
Bhat Nadi has been chosen in the campaign Chala januya nadila esakal

Dhule News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर ‘चला, नदीला जाणू या’ हे नदी अमृतजल यात्रा मिशन राबविले जात आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमधील मोठ्या धुमधडाक्यात सुरू झालेला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम तूर्त संथगतीने सुरू आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यातील जलसमन्वयकांच्या प्रत्येक आठवड्याला तीन बैठका होत आहेत. (Concrete action plan for 108 rivers in state soon dhule news)

जिल्ह्यातील भात आणि पांझरासह राज्यातील १०८ नद्यांचा भक्कम आराखडा तयार होत आहे. तो ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने नदी यात्रेला मूर्त स्वरूप येईल अन् कृती आराखड्यानुसार कामे सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रत्येक नदीचा उगमस्थानासह पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर पाणी शुद्ध असते. नदीची नागरी वस्तीकडे शुद्धता संपली आहे. मनुष्य हा संस्कृती आधुनिकीकरणामुळे जलसंस्कृती हळूहळू विसरत चालला आहे. पाणी वेगवेगळ्या माध्यमातून अशुद्ध करत चालला आहे.

नद्यांचे स्वास्थ्य अति आधुनिकीकरणामुळे आणि मानवी दुर्लक्षामुळे बिघडले आहे. नदी बारमाहीची केवळ हंगामी झाली. आता बारमाही करण्यासाठी शासनाच्या आराखड्यास आणि प्रयत्नांना ग्रामस्थांनी साथ देणे आवश्यक आहे. बारमाही नदी ही लोकचळवळ झाली पाहिजे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खानदेशातील तेरासह राज्यातील १०८ नद्यांचे भाग्य बदलणार आहे. यासाठी केंद्र सरकारचीही ठोस मदत होणार आहे. राज्य शासनाने ठोस आणि जलद पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhat Nadi has been chosen in the campaign Chala januya nadila
NMC News : महापालिका हद्दीतील 4 शाळा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 48 तासांची मुदत

नद्यांना हवी झेड सुरक्षा

देशातील महत्त्वपूर्ण व्यक्तींना झेड सुरक्षा पुरविली जाते. देशातील नद्या जीवनदायिनी आहेत. त्यांचे स्वास्थ्य बिगडत आहे. तसे जनतेचेही स्वास्थ्य बिघडत चालले आहे. नदीचे महत्त्व जाणून, नदी प्रदूषित करणाऱ्‍या ठिकठिकाणी झेड सुरक्षा पुरविणेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा मतप्रवाही जल जनजागृती करणारे समाजसेवक व्यक्त करीत आहेत.

वर्धा सेवाग्राममध्ये महत्त्वपूर्ण बैठक

राज्यातील १०८ नद्यांच्या कृती आराखड्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममध्ये २१ व २२ मेस महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीस राज्यातील जलतज्ज्ञ व जिल्हा जलसमन्वयक उपस्थित राहणार आहेत. जलपुरुष राजेंद्र चौहान मार्गदर्शन करणार आहेत.

"एकशे आठ नद्यांचे पुनरुजीवन, सौंदर्य आदींबाबत ठोस कृती आराखडा तयार होत आहे. हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यास सरकार आणि लोकसहभागातून तडीस न्यायचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील नद्यांचे पन्नास पानांचे सादरीकरण जलप्रदूषण मंडळाकडेही केले आहे."-भिला पाटील, समन्वयक भात व पांझरा नदी आणि कार्यवाह जल परिषद, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ

Bhat Nadi has been chosen in the campaign Chala januya nadila
Dhule Municipality Fraud : धुळेकरांची फसवणूक; घोटाळेबाज आस्था संस्थेला टेकाळे, कापडणीसांचे अभय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com