कॉंग्रेस उमेदवार निश्‍चितीसाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या 73 गट व 146 गणांसाठी कॉंग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवार निश्‍चितीसाठी कॉंग्रेसने जिल्हा पातळीवर समिती स्थापन केली आहे. समितीतर्फे 26 जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी तयार करून प्रदेश कॉंग्रेसला पाठविली जाईल. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर प्रदेश पातळीवरून 31 जानेवारीस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कॉंग्रेस जिल्हा कमिटीत आज कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, श्‍याम सनेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सुनील आव्हाड यांच्या उपस्थितीत सर्व 15 तालुक्‍यांतील गट व गणांसाठी कॉंग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत आमदार के. सी. पाडवी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की सर्व 15 तालुक्‍यांमधील इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. आमच्याकडे सर्व ठिकाणी उमेदवार आहेत. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्यास त्याचा फायदा भाजप, शिवसेनेला होऊ नये यासाठी निवडून येऊ शकेल अशाच ठिकाणी स्वतंत्र लढा अन्यथा आघाडी करा, असा संदेश आजच्या मुलाखतीवेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले असून, उमेदवारांची अंतिम यादी 26 जानेवारीपर्यंत तयार करून जिल्हा कॉंग्रेसकडून प्रदेशला पाठविली जाणार आहे. 

सन्मानपूर्वक आघाडी ः जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे 
कॉंग्रेस पक्षाने तत्त्वता राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आघाडी सन्मानपूर्वक व्हावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा पक्षाने स्वबळावर लढण्याचीही तयारी केली असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले. 

जिल्हा निवड अध्यक्षपदी विखे पाटील 
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे उमेदवार ठरविण्यासाठी कॉंग्रेसने जिल्हा निवड समिती तयार केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. याशिवाय समितीत सदस्य म्हणून जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, निरीक्षक डी. जी. पाटील, राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, शिरीषकुमार कोतवाल, रामदास चारोसकर, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते आदींचा समावेश आहे. ही समिती अंतिम उमेदवार यादी तयार करून प्रदेशला पाठविणार आहे. 

Web Title: Congress established the committee confirmed candidate for district level