कॉंग्रेस जनसंघर्ष यात्रेचा आज फैजपुरातून प्रारंभ

Congress
Congress

जळगाव - कॉंग्रेस जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून (ता. 4) फैजपूर येथून सुरवात होणार आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षाचे 50 आमदार यात सहभागी होणार आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या भूलथापांबाबत जनतेत जागृती करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राज्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कोल्हापूर येथून पहिल्या टप्प्यातील यात्रा काढण्यात आली. फैजपूर येथील धनाजीनाना महाविद्यालयाच्या मैदानातून उद्या (ता. 4) दुसऱ्या टप्प्यातील रॅलीस प्रारंभ होणार आहे. याच मैदानावर 1936 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झाले होते. याच ठिकाणाहून या यात्रेस प्रारंभ होत असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. सकाळी दहाला यात्रेचा प्रारंभ होणार आहे. फैजपूर येथून सकाळी दहाला प्रारंभ होऊन दुपारी चारला जनसंघर्ष यात्रा बोदवड येथे जाईल. गांधी चौकात जाहीर सभा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com