नाशिकमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचा जुळला सूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

नाशिक ः नाशिक महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीचा सूर जुळला आहे. 3 प्रभागातील 4 जागा वादात असून, त्यावर प्रदेशस्तरावरून निर्णय घेतला जाणार आहे. निम्म्या-निम्म्या जागांचे सूत्र निश्‍चितीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आघाडीबद्दलचा निर्णय घेतला जाणार होता. प्रत्यक्षात मात्र आव्हाड उपस्थित राहिले नाहीत. विखे-पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, अश्‍विनी बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश नेते नानासाहेब महाले यांच्या उपस्थिती ही बैठक रात्रीपर्यंत चालली.

Web Title: congress ncp together in nashik