Dhule : अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह

Congress satyagrah against agnipath scheme
Congress satyagrah against agnipath schemeesakal

शिरपूर (जि. धुळे) : केंद्र शासनातर्फे (Central government) सैन्यभरतीसाठी प्रस्तावित अग्निपथ योजनेच्या (Agnipath scheme) निषेधार्थ येथील काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २७) तहसील कार्यालयाबाहेर सत्याग्रह (Satyagrah) केला. तहसीलदार आबा महाजन यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. (Congress Satyagraha against Agneepath Yojana Dhule News)

सोमवारी सकाळी दहाला तहसील कार्यालयाबाहेर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ फलक झळकावून पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांनी अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना भाजपचे पदाधिकारी आमच्या कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ, अशी विधाने करीत आहेत, त्यावरून भाजपचे बेगडी देशप्रेम दिसून येत असल्याचे सांगितले. अग्निपथ योजनेसह केंद्र शासनाच्या विविध धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार आबा महाजन यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

Congress satyagrah against agnipath scheme
बंडखोरांवरील कारवाईच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी दिंडोरी

अग्निपथ चार वर्षांनंतर युवकांना वाऱ्यावर सोडून देणारी योजना आहे. देशसेवा करणाऱ्या जवानांचा या योजनेद्वारे अवमान होणार आहे. देशाच्या सुरक्षेसारख्या अतिमहत्त्वाच्या बाबीशी तडजोड कदापिही मान्य नसून त्याविरोधात देशभरात उद्रेक पसरला आहे. युवकांच्या भवितव्याशी खेळत कंत्राटी लष्करभरती करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केंद्र शासनाने देशाची माफी मागावी व ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू भोई, शहराध्यक्ष उत्तमराव माळी, शिसाकाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा, ज्येष्ठ पदाधिकारी अरुण दलाल, मोहन पाटील, उदय पाटील, संजय जाधव, निखिल पाटील, विजय तिवारी, अ‍ॅड. गोपालसिंह राजपूत, चंदुलाल फुलारी, आर. आर. माळी आदींनी निवेदनातून केली आहे.

Congress satyagrah against agnipath scheme
धुळ्यात बर्निंक ट्रकचा थरार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com