PHOTOS : महासभेत राहुल गांधी विरुद्ध मोदी-शाह..सत्ताधारी-विरोधक आमने सामने

विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

महासभेत राहुल गांधी यांच्या निषेधाचा प्रस्ताव संभाजी मोरुस्कर, प्रा.शरद मोरे, योगेश हिरे यांनी मांडला, सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी अर्धा तासासाठी सभा तहकूब करण्याची मागणी केली, 20 मिनिटे सभा तहकूब केल्यानंतत भाजप नगरसेवक वेल मध्ये उतरले, राहूल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देताना महिला नगरसेवकांनी बांगड्या दाखविल्या त्यास प्रत्युत्तर देताना काँग्रेस नगरसेवकांनी मोदी-शाह मुर्दाबादच्या घोषणा दिल्या काँग्रेस नगरसेवक राहुल दिवे यांनी चपला दाखवली.

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या व्यक्तव्याचा निषेध म्हणून सभागृहाबाहेर निषेधाच्या घोषणा देणाऱ्या भाजप नगरसेवकांनी सभागृहात ही तीच भूमिका घेत निषेधाच्या घोषणा दिल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नगरसेवकांनी मोदी-शहा मुर्दाबादच्या  घोषणा दिल्या.

Image may contain: 9 people, people smiling, people sitting, crowd and indoor

(सर्व फोटो - सोमनाथ कोकरे)

परत द्या, परत आमचे पैसे परत द्या

महासभेत राहुल गांधी यांच्या निषेधाचा प्रस्ताव संभाजी मोरुस्कर, प्रा.शरद मोरे, योगेश हिरे यांनी मांडला, सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी अर्धा तासासाठी सभा तहकूब करण्याची मागणी केली, 20 मिनिटे सभा तहकूब केल्यानंतत भाजप नगरसेवक वेल मध्ये उतरले, राहूल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देताना महिला नगरसेवकांनी बांगड्या दाखविल्या त्यास प्रत्युत्तर देताना काँग्रेस नगरसेवकांनी मोदी-शाह मुर्दाबादच्या घोषणा दिल्या काँग्रेस नगरसेवक राहुल दिवे यांनी चपला दाखवली,

Image may contain: 3 people, including Omprakash Chouhan, people standing

त्यापूर्वी भाजप नगर सेवकांनी सभागृबाहेर देश भक्ती किसका नाम सावरकर..सावरकर अशा घोषणा दिल्या. भाजप, काँग्रेसचे नगरसेवक एकीकडे भिडले असताना शिवसेनेने महासभा तहकूब करण्यासाठी भाजपचा डाव असल्याचा आरोप केला तर परत द्या, परत आमचे पैसे परत द्या असा आवाज शिवसेनेच्या गोटातून आल्याने तणावातही हास्य पसरले.

Image may contain: 15 people, people smiling, people sitting, crowd and indoor

Image may contain: 6 people, people smiling, people sitting and crowd


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress versus BJP supporters in the General Assembly Nashik Political Marathi News