"केळीचे अर्थकारण संपविण्याचे षड्‌यंत्र' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

रावेर - खानदेशी केळीवर "निपाह' रोगाचे विषाणू असल्याची उत्तर भारतातील अफवा म्हणजे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील केळीचे अर्थकारण उद्‌ध्वस्त करण्याचे षड्‌यंत्र असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्‍त होत असून, जिल्ह्यातील केळीवर "निपाह'च्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याची शक्‍यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. 

"निपाह'चा व्हायरस केळीवर पडल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात विशेषतः पंजाबमध्ये केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नसल्याबद्दल "सकाळ'ने केळीतज्ञ के. बी. पाटील यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की "निपाह' रोगाचा नैसर्गिक प्रचारक म्हणजे वटवाघूळ. वटवाघळाने फळे कुरतडून खाण्यामुळे "निपाह'चे विषाणू फळात शिरतात. आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात जी केळी उत्पादित होते, तिथे वटवाघूळच काय पण पोपटासारखे पक्षीही कधी केळी खात नाहीत. त्यामुळे केळीत निपाहच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाही.'' 

दिल्ली समितीचे आवाहन 
दिल्ली (नया आझादपूर) बाजार समितीचे सचिव तेजिंदरसिंह माकन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील केळी बागा आम्ही पाहिल्या आहेत. इथले शेतकरी केळी बागा इतक्‍या स्वच्छ ठेवतात, की कोणतेही पक्षी अथवा वटवाघूळ यात जाण्याची आणि केळी खाण्याची सुतराम शक्‍यता नाही. त्यामुळे निपाहच्या अफवेवर विश्वास ठेवू नये.

Web Title: Conspiracy to break banana economy