कामगार कार्यालयात बांधकाम कामगारांचा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

जळगाव - शहरातील बाराशे ते पंधराशे बांधकाम कामगारांची अर्थसाहाय्य देण्याबाबतची प्रकरणे घेताना सहाय्यक कामगार कार्यालयाकडून विविध कारणांनी "ब्रेक' लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम कामगारांसाठी शासनाने तातडीने पाच हजारांचे आर्थिक सहाय्य मंजूर करूनही कामगारांना या अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. दरम्यान कामगारांमध्ये असंतोष असल्याने आज दुपारी बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला. 

अर्थ सहाय्याची प्रकरणी स्वीकारत नसल्याबाबत जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने आमदार सुरेश भोळे यांच्याकडेही तक्रार केली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात आले. तेथे सहाय्यक कामगार आयुक्तांना प्रकरणे का स्वीकारली जात नाही, याबाबत जाब विचारला. त्यातून वाद वाढला. यामुळे गोंधळ झाला. शेवटी दोघांनीही समजूतीची भूमिका घेतल्याने वाद मिटला. 

बांधकाम कामगारांचे आरोग्य विमा योजनेचे लाभ, कल्याणकारी मंडळाच्या लाभाची (शिष्यवृत्ती, प्रसूती अनुदान, विवाह अनुदान) अशी प्रकरणे 2016 पासून पात्र व मंजूर असताना आजपर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून लाभ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

कागदपत्रांची सक्ती 
बांधकाम कामगारांना शासनाने मंजूर केलेले साहित्य खरेदी अनुदानाचे लाभार्थी अर्ज स्वीकारताना रेशन कार्ड, मतदान कार्ड याची सक्ती शासनाने केलेली नाही. तरीही ते देण्याची सक्ती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून केली जात आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी, पुनर्नोंदणी करताना एक ते दहा तारखेदरम्यान सलग केली जात नाही. आठवड्यातून एक दिवस केली जाते. यामुळे अनेक कामगार वंचित आहेत. 

कामगार काय म्हणतात... 
रेशनकार्ड पॅनकार्ड गरज नसताना मागणी 
विजय पवार (जनरल सचिव) ः कोणत्याही बांधकाम कामगारास पाच हजारांचे अर्थसाहाय्य मंजूर आहे. ते संबंधित कामगाराच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. केवळ चारच कागदपत्र गरजेचे असताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून रेशन कार्ड, पॅनकार्डची मागणी केली जाते. दिले तरी त्यात त्रुटी काढून कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत. 

दोन दिवसांपासून चकरा 
धनराज कोळी (कानळदा) ः बांधकाम साहित्य घेण्यासाठी मी अर्ज केला. मात्र कामगार कार्यालयातर्फे मतदान कार्ड पाहिजेच अशी अट घातली. मी दोन दिवसांपासून कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जात आहे. 

नियमानुसारच मागणी 
प्रकाश चव्हाण (सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव) ः आम्हाला बांधकाम मंडळाने प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची यादी दिली आहे. त्यानुसार आम्ही कागदपत्रे स्वीकारीत आहे. कामगारांशी आम्ही सौजन्याने वागतो. चेकलिस्ट नूसारच प्रस्ताव स्वीकारले जातील. 

Web Title: Construction workers huddle