शालेय गणवेशासाठी ठेकेदारांचे "लॉबिंग' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिक - सर्वशिक्षा अभियान व महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असली तरी ठराविक ठेकेदारांकडूनच गणवेश खरेदी करण्यासाठी भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केले आहे. प्रशासनावर तसा दबाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत गणवेश वाटप केले जाते. यंदा पहिली ते आठवीच्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील 23 हजार 488 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश पुरविले जाणार आहेत. एका गणवेशासाठी तीनशे रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 40 लाखांचा खर्च केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश देताना शालेय व्यवस्थापन समिती सुचवेल त्याप्रमाणेच गणवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील पाच हजार विद्यार्थ्यांनादेखील महापालिका स्वखर्चाने गणवेश देणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत गणवेश देण्याच्या सूचना असल्याने गणवेश खरेदीची धावपळ महापालिकेत सुरू आहे. परंतु गणवेश देताना ठराविक ठेकेदारांकडूनच गणवेश खरेदी करण्यासाठी नगरसेवकांकडून ठेकेदारांचे लॉबिंग सुरू आहे. परंतु एकापेक्षा अधिक नगरसेवकांनी ठेकेदारांचे प्रस्ताव दिल्याने प्रशासन गोंधळात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण प्रशासनाधिकाऱ्यांकडे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची बैठक बोलावून त्यात ठेकेदारांची नावे सुचविल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांच्या लॉबिंगमुळे गणवेशाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Contractor lobbying for school uniform