Dhule News : ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suspend News

Dhule News : ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित

धुळे : शहरातील देवपूरमधील ऊर्दू प्राथमिक शाळेतील ‘त्या’ वादग्रस्त उपशिक्षकाला संस्थेने बुधवारी (ता. १८) निलंबित केले.

संस्थेच्या माहितीनुसार उपशिक्षक अन्सारी अबुजर याच्याविरुद्ध काही वर्षांपासून शाळेत उपस्थिती नसणे, सोपविलेले काम पूर्ण न करणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे आदी तक्रारी, आरोप होते. गंभीर बाब म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिकेकडेच अन्सारीने अशोभनीय मागणी केली. (Controversial Deputy Teacher Ansari Abuzar Institute suspended Dhule News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

तिला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित उपशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली.

जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा मुख्याध्यापिकेला दमदाटी केली. त्याच्या या कारनाम्यामुळे संस्थेची बदनामी झाली. संस्थास्तरावर नियमानुसार अन्सारीची चौकशी होणार आहे. निःपक्ष चौकशीकामी संस्थेने अन्सारीला निलंबित केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षांनी दिली.

हेही वाचा: Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी