धुळे महापालिका निवडणूक : गुंडगिरीचे मुद्दे, आरोपांचा धुरळा

निखिल सूर्यवंशी 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नेतृत्वावरून भाजपचे तीन मंत्री आणि आमदारांमध्ये टोकाचा वाद, आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करणे, कमरेखालच्या भाषेतून वार करणे, आमदारांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविणे, तसेच गुंडगिरी, सामाजिक सुरक्षिततेच्या मुद्यावरून धुळे महापालिकेची निवडणूक राज्यात गाजते आहे. 

यात ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले आहेत. नऊ डिसेंबरला मतदान, तर दहा डिसेंबरला निकाल जाहीर होईल. 

केंद्रातील संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, निवडणुकीचे प्रभारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल विरुद्ध आमदार गोटे आणि आमदार गोटे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडी, इतर मित्र पक्ष विरुद्ध भाजप, अशी ही लढत रंगली आहे. ‘ड’ वर्ग महापालिकेची निवडणूकही राज्यस्तरीय नेत्यांची व तीदेखील अत्यंत प्रतिष्ठेची होत असेल, तर स्थानिक कार्यकर्त्यांनी काम करायचे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. निवडणुकीत गुंडगिरीचे मुद्दे व त्यासारखीच भाषा प्रचारात बोलली जात असेल, एकमेकांची ‘मापे’ काढण्याची स्पर्धा लागली असेल, तर राजकीय अधःपतन नव्हे, तर ही निवडणूक नेमकी काय संदेश देणारी आहे, यावरच आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Controversy in the BJP on leadership