मुंबई-जळगाव प्रवासात कोव्हीड-19ची लागण

corena positiv in jalgaon
corena positiv in jalgaon

जळगाव...सावधान ! 

मुंबई-जळगाव ट्रॅव्हल्स्‌ दरम्यान कोरोना झाल्याचा संशय 

त्या रुग्णाच्या संपर्कातील "सुपरस्प्रेड' शोधणे मोठी कसरत 

सकाळ वृत्तसेवा 
जळगाव, ता. 28 :- मुंबई जळगाव प्रवासात जळगावातील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोना,कोव्हीड-19 ची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आजवर जळगावकर आणि जिल्हा व पोलिस प्रशासन एकही पॉझेटीव्ह नाही म्हणुन शांत होते, त्यांना आता खळबळून जाग आली असावी. बाधीत व्यक्ती हा ज्या वाहनाने मुंबई ते जळगाव प्रवास करुन आला त्या वाहनातील "सुपरस्प्रेड' अर्थात प्रमुख बाधीतास शोधणे व या दोघांपासून आणखी किती लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत, याचाही शोध घेण्याची मोठी कसरत जिल्हा व पोलिस प्रशासनाला करवी लागणार आहे. 

आजवर जळगावात आणि खानदेशात एकही रुग्ण कोरोना अर्थात कोव्हीड-19 या विषाणुने बाधीत नसल्याने जिल्हा व पोलिस प्रशासनाने नागरीवस्त्या आणि मुख्य रस्त्यांवर संचारबंदी शिथील ठेवण्यात आली होती. आज चक्क रस्त्यावरील आणि चौका-चौकातील पोलिस गायब होते. शहरातील अंत्यत दाट संमिश्र लोकवस्ती असलेल्या परीसरातील 45 वर्षीय गृहस्थ मुंबई हून जळगावला आल्यापासून त्यांना त्रास जाणवत होता. त्यांनी परिसरातील खासगी डॉक्‍टरला तीनचार दिवसांपुर्वी दाखवले मात्र, उपयोग न झाल्याने अखेर शुक्रवार(ता.27) रोजी जिल्हारुग्णालयाचा रस्ताधरला. ताप, सर्दि, खोकला आणि दम लागण्याचा त्रास जाणवत असल्याने श्‍वात्सोश्‍वास घेण्यासही त्याला त्रास होवू लागल्यानंतर जिल्हारुग्णालयात सकाळी त्यास दाखल करण्यात आले. शुक्रवार(ता.27) सकाळ पासूनच त्याला त्रास जाणवत असल्याने त्याच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या इतर दोन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तीन पैकी 1 नमुना पॉझेटीव्ही आल्याचा रिपोर्ट दाखल झाल्यावर मात्र, जिल्हा प्रशासनासह वैद्यकिय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे, प्रशासनांच्या रात्रीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. 

सुपरस्प्रेड शोधणार कसे? 
कोरोना पॉझेटीव्ह असलेला रुग्ण हा मुळात मुंबई-जळगाव अशा प्रवास दरम्यान बाधीत झालेला आहे. जळगावच्या रुग्णाच्या शरिरात ज्याच्याकडून हा विषाणु शिरला तो, सुपरस्प्रेड (प्रमुख बाधीताने) या रुग्णासह त्याच वेळी इतरांनाही बाधीत केलेले असून. जळगावच्या रुग्णाच्या संपर्कातील त्याचे कुटूंबीय, मित्र आणि परिसरातील रहिवासी अशांचा शोध घेवुन त्यांच्या तपासण्या करवुन घेणे आणि लक्षणे आढळणाऱ्यांना तातडीने कॉरेन्टाईन करण्याची कसरत आता पासुनच करावी लागणार आहे. 

नागरीवस्त्यां प्रमुख ठिकाणे 
ज्या रहिवासी परिसरातून हा रुग्ण आहे तेथे अतिरीक्त दाट लोकवस्तीचा परिसर असून गेल्या बारा-पंधरा दिवसात या रुग्णाच्या संपर्कात अनेक सुदृढ नागरीक नक्कीच आलेले असावेत. त्याच प्रमाणे शहरातील दाट लोकवस्तीच्या इतरही ठिकाणांवर आता सक्तीने आरोग्ययंत्रणेने काम करणे अपेक्षीत आहे.कारण, ताप, सर्दि खोकला जाणावणारे आणि बाहेगावाहून आलेल्यांनी यापुर्वीह फॅमीली डॉक्‍टर कडे प्राथमीक उपचारा दरम्यान आपली "हिस्ट्री' प्रवासाची माहिती पुर्णत: लपवल्याची बाब समोर येत आहे. 

सक्तीची संचार बंदी व्हावी 
जळगाव शहरातील पोलिस यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने कलम-144 लागू झालेले असतांनाही शहरात त्यांचे गांभीर्य नसल्याने लोकांचा मुक्तपणे संचार जिवावर उठणारा आहे. आज पॉझेटीव्ह रुग्ण आढळल्याने यंत्रणेला खळबळून जाग येवुन उद्यापासून तरी त्याचे पालन व्हावे अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com