मका अन्‌ सोयाबीनचा बाजार निस्तेज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नाशिक - मका अन्‌ सोयाबीन या "कॅशक्रॉप'च्या उत्पादनात यंदा 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असतानाच चलनाच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे मका आहे पण पैसा नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उत्पादनवाढीचे संकट झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना मंदीच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ग्रामीण अर्थवाहिनी निस्तेज बनली आहे. 

पाचशे-हजाराच्या नोटांवरील बंदीनंतर चलन वापरासंबंधी सतत बदलत असलेल्या धोरणांमुळे मका, सोयाबीनच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार शेतकऱ्यांना नजरेच्या टप्प्यात दिसत नाहीत. त्यातूनच स्वाभाविकपणे बाजारपेठेत आवक वाढताच, भावात आणखी घसरण होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दुकानदारांकडील पत संपलेली आहे. त्यातून सावरण्यासाठी मका, सोयाबीनच्या विक्रीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण शेतीमालाची विक्री होत नसल्याने रब्बीमधील कांदा, हरभरा, गहू लागवडीसाठी पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबणार हे स्पष्ट झाले आहे. देशामध्ये गेल्या वर्षी 155 लाख टन मक्‍याचे उत्पादन झाले होते. सरकारच्या आकडेवारीनुसार यंदा हेच उत्पादन 192 लाख टनांपर्यंत पोचणार आहे. यंदाच्या खरिपात सर्वाधिक 85 लाख हेक्‍टरवर देशात मक्‍याची लागवड झाली. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पशुखाद्य आणि खाद्यतेलाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या सोयाबीनची देशाला सर्वसाधारणपणे 80 लाख टनांची गरज भासते. यंदा हेच उत्पादन 112 लाख टनांपर्यंत पोचणार आहे. 

कुक्कुटपालन उद्योगाला झळा 

मका आणि सोयाबीनची बाजारपेठ थांबल्याच्या झळा प्रामुख्याने स्टार्च कंपन्यांसह कुक्कुटपालन उद्योगाला बसू लागल्या आहेत. यंदा उत्तर प्रदेश, बिहारमधील शेतकऱ्यांकडे बियाणे घ्यायला पैसे नसल्याची माहिती पुढे येत असतानाच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सोयाबीनचे पीक कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Corn and soybean market peaked