कोरोनाबाधितांवरील अंत्यविधीस्थळी सोयी-सुविधांचा वानवा 

कोरोनाबाधितांवरील अंत्यविधीस्थळी सोयी-सुविधांचा वानवा 

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. यात चक्कर बर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामागील मोकळ्या भूखंडावर मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्या ठिकाणी सोयी-सुविधांची वानवा असल्याची कैफियत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी मांडली. 


ते म्हणाले, की हिरे वैद्यकीय महाविद्यालयामागील मोकळ्या जागेत गेल्या तीन ते चार दिवसांत सरासरी ५० बाधितांवर अंत्यसंस्कार झाले. मात्र, त्या ठिकाणी सोयी-सुविधांची कमतरता असल्याने संबंधितांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. तेथे महापालिकेकडून साफसफाई होत नाही. तसेच पाण्याची सोय नाही. याकडे महापालिकेचे वारंवार लक्ष वेधूनही उपयोग होत नसल्याची खंत आहे. 


कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी विरोध होत होता. त्यामुळे पीडित नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकाराने ही जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वर्षभरापासून महाविद्यालयामागील जागेत अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. ही स्थिती पाहता महापालिकेने संबंधित जागेत नियमित साफसफाई करणे, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करणे, उन्हाळ्यामुळे पीडित नातेवाइकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची शेड करणे, मृत्यू दाखल्याच्या नोंदीची व्यवस्था करणे, एकाच ठिकाणी संकलित राख ठेवण्याची किंवा ती पांझरा अथवा तापी नदीत विसर्जित करणे, रात्री अंत्यविधी झाल्यास दिवाबत्तीची सोय करणे गरजेचे आहे, असे श्री. अग्रवाल यांनी म्हटले आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com