esakal | धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा २१ हजाराचा टप्पाही पार 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा २१ हजाराचा टप्पाही पार 

धुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबळींची संख्या १८० तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३९९ वर पोहोचली.

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा २१ हजाराचा टप्पाही पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यात आणखी एक बळी गेला तर ३६३ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३९९ व कोरोनाबाधितांची संख्येने २१ हजाराचा टप्पाही ओलांडला. 

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही जिल्ह्यात नगण्य स्थितीवर आले होते. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाल्याचा जिल्हावासियांना दिलासा होता. गेल्या काही दिवसांपासून मात्र कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही पुढे सरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात शनिवारी (ता.२०) पुन्हा भर पडली. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मोहाडी येथील ५१ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे धुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबळींची संख्या १८० तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३९९ वर पोहोचली.

दरम्यान, आज जिल्हाभरात २८९ नवीन कोरोनाबाधितही आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या आकडाही २१ हजार २११ वर पोहोचला. शनिवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे : जिल्हा रुग्णालय धुळे (२६२ पैकी ५५), प्राथमिक आरोग्य बोरकुंड, लामकानी, बोरीस (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ५३ पैकी ०५), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (५० पैकी २५), प्राथमिक आरोग्य केंद्र होळनांथे, बोराडी, सांगवी, खर्दे (ता.शिरपूर) (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १२२ पैकी १५), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (७७ पैकी २३), प्राथमिक आरोग्य केंद्र निमगुळ, चिमठाणे (ता. शिंदखेडा) (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ७७ पैकी २५), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (१३७ पैकी ५८, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ९० पैकी ४१), धुळे महापालिका कोविड केअर सेंटर (५२३ पैकी ३ ), धुळे महापालिका यूपीएचसी (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ६९७ पैकी १४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (५० पैकी १८), एसीपीएम लॅब (२४ पैकी ९), खासगी लॅब (१९९ पैकी ७२).  
 

loading image