
कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी वाढ झाली. याबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्यानेही १५ हजारांचा टप्पा पार केला.
धुळे ः जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांचा आलेख काही दिवसांच्या तुलनेत वर गेला. त्यामुळे यंत्रणेसह जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही बाब चिंतेत टाकणारी आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी वाढ झाली. याबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्यानेही १५ हजारांचा टप्पा पार केला. गुरुवारअखेर बाधितांची संख्या एकूण १५ हजार ३० वर पोचली.
गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः धुळे जिल्हा रुग्णालय (४६ पैकी नऊ) ः बालाजीनगर धुळे- १, सुयोगनगर धुळे- १, गल्ली नंबर चार- १, गल्ली नंबर पाच- १, गौरव सोसायटी धुळे- १, नकाणे रोड धुळे- १, वलवाडी शिवार- १, देवकीनंदन सोसायटी वलवाडी शिवार- १, शेवाडे, साक्री- १. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय (४७ पैकी तीन) ः संदीपनी कॉलनी शिरपूर- १, वरवाडे शिरपूर- १, आर. सी. पटेल कॉ. शिरपूर- १. प्राथमिक आरोग्य केंद्र बोरीस, कापडणे, आर्वी, नेर (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ४६ पैकी शून्य). भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (३५ पैकी दोन) ः पी. डी. देवरे कॉ. म्हसदी, साक्री- १, वार्सा साक्री- १, तसेच रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे तीनपैकी दोन) ः सरस्वतीनगर साक्री- १, वासखेडी ग्रामपंचायत साक्री- १. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (१२ पैकी तीन) ः देवपूर धुळे- १, धुळे- १, कासारे साक्री- १. धुळे महापालिका (३४ पैकी शून्य). एसीपीएम लॅब (तीनपैकी एक) ः कमखेडा शिंदखेडा- १. खासगी लॅब (२१ पैकी आठ) ः गल्ली नंबर एक मामलेदार कचेरी जवळ- १, साक्री रोड- १, अकबरी मशीद चाळीसगाव रोड धुळे- १, नागाई कॉलनी धुळे- १, राजवाडेनगर धुळे- १, शिवाजी नगर देवपूर धुळे-१, मोगलाई साक्री रोड- १, भतवाल हॉलजवळ मालेगाव रोड- १, विद्युत कॉलनी जळगाव- १.
संपादन- भूषण श्रीखंडे