esakal | कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल

लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी सजविले होते.

कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः  देशाच्यादृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला. 

आवश्य वाचा- शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित; जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष सुरू 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी निलीमा वळवी यांनी पहिली लस घेतली. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते. 

पुढे बोलतांना पालकमंत्री ॲंड पाडवी म्हणाले, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

...असे सुरू झाले लसीकरण 
लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना लस देण्यात आली. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंद देखील घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना ३० मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

वाचा- पढावद शिवारात पाचशे एकरवर होणार रेवती दादर प्रकल्प
 

येथे झाले लसिकरण
जिल्हा रुग्णालयासह अक्कलकुवा, म्हसावद ग्रामीण रुग्णालय व नवापूर उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रावर दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे ७५ कुप्या (७५० डोस), म्हसावद १७० (१७०० डोस), नवापूर ८५ (८५० डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या १२० कुप्या (१२०० डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत. 

अक्कलकुवा येथे लसीकरण 
अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय येथे कॉविड-१९ ची लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे.या प्रसंगी अक्कलकुवा नायब तहसीलदार अजित शिंत्रे,वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंगटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.के.वळवी,हवालदार दिपक पाटील,होमगार्ड विपुल शिंपी, सुनील झाल्टे व रुग्णालय कर्मचारी आदि उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top