मतदारांची नावे अन्य प्रभागांत गेल्याने नगरसेवक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. मूळ प्रभाग सोडून मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने त्याविरोधात नगरसेवक आक्रमक झाले आहेत. कालपर्यंत ४३ हरकती दाखल झाल्या होत्या, त्यात आज १४ हरकतींची भर पडली. बहुतांश नगरसेवकांनी प्रारूप मतदारयाद्यांवर हरकत नोंदविली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयाद्यांची घोषणा काल झाली. १७ जानेवारीपर्यंत हरकत घेता येईल. २१ जानेवारीला अंतिम मतदारयादी घोषित होईल. मंगळवारपर्यंत हरकती घेता येणार असल्याने गुरुवारपासून हरकती दाखल होण्यास सुरवात झाली. प्रभागांमध्ये इतर प्रभागांतील नावांचा समावेश झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. आज सुवर्णा मटाले यांनी हरकत दाखल केली. त्यात प्रभाग २८ मधील नावे २५, २६ व २७ मध्ये समाविष्ट केल्याची हरकत त्यांनी घेतली. नागरी पर्यावरण संस्थेने प्रभाग १३मध्ये इतर भागांतील नावे समाविष्ट झाल्याचे सांगितले. लक्ष्मण जायभावे यांनी प्रभाग २८ मधील नावे प्रभाग २९ मध्ये समाविष्ट झाल्याची तक्रार नोंदविली. दिगंबर गोरवाडकर यांनी प्रभाग २७ मधील नावे २९ मध्ये समाविष्ट झाल्याचे, तर राहुल मटाले यांनी प्रभाग २५ मधील नावे २८ मध्ये समाविष्ट झाल्याची तक्रार केली. संदेश फुले यांनी प्रभाग १३मधील नावे प्रभाग १४ मध्ये, तर नितीन खोले यांनी प्रभाग २१ मधील मतदारयादीत फक्त आडनावांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. मीराबाई खेताडे यांनी सिडकोतील प्रभाग २६ ची नावे पंचवटी विभागातील प्रभाग ११ मध्ये समाविष्ट झाल्याची हरकत नोंदविली.

प्रभाग १६ मध्ये ९५० मतदार
प्रभाग १६ बाबत विद्यमान नगरसेवक राहुल दिवे यांनी हरकत नोंदविली. त्यांच्या प्रभागात अन्य प्रभागातील साडेनऊशे मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. त्या मतदारांचा प्रभाग १६ मध्ये समाविष्ट होण्याचा काडीमात्र संबंध नाही. विशेषतः प्रभाग २३ मधील नावे समाविष्ट करण्यात आली.

Web Title: Corporator aggressive for voter name other division