नगरसेवकाने धरली पोलीस अधिकाऱ्याची गचांडी..अन्..

taharabad report.jpg
taharabad report.jpg

नाशिक : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत आलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पांढरे व ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

नगरसेवक देवरे व अन्य ग्रामस्थ फरार

सटाणा नगरपरिषदेचे भाजपा गटनेते महेश देवरे यांनी पोलिस अधिकाऱ्याची गचांडी धरून धक्काबुक्की केल्याने त्यांच्यासह सहा ते सात ग्रामस्थांनी विरोधात भादवि कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक देवरे व अन्य ग्रामस्थ फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याने याबाबत खळबळ माजली आहे.पारनेर येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असताना पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांढरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.यावेळी काही ग्रामस्थ मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत घोळक्याने उभी असल्याने पांढरे यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपा गटनेते महेश देवरे व पांढरे यांच्यात खडाजंगी होवून परस्परांना धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.देवरे व अन्य सहा ते सात जणांविरोधात भादवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com